• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २२

सागर
गुरुवार, 19 August, 2010 - 20:17
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

स्वामी
 

संकेत देण्याची गरज नाही याची खात्री वाटते. मराठी साहित्यात थोडीफार रुची असणार्‍या वाचकाने हे पुस्तक वाचलेलेच असते.

तरीही संकेत हवा असेल तर एकूण ३ संकेत देण्यात येतील

संकेत १: कादंबरी आहे
संकेत २: या कादंबरीचा लेखकाच्या यशात मोठा सहभाग आहे
संकेत ३: गरज पडली नाही...

बरोबर उत्तर देणार्‍या प्रभाकर आणि श्रावण यांचे अभिनंदन Smile

खूपच सोपा वेचा दिला. कादंबरीत माधवरावांचे नाव जवळजवळ प्रत्येक पानावर आहे. ही सुरुवात कदाचित दिशाभूल करणारी ठरु शकली असती. पण हरकत नाही. दोन बरोबर उत्तरे तत्काळ आली यावरुनच माझा हा अंदाज (मराठी साहित्यात थोडीफार रुची असणार्‍या वाचकाने हे पुस्तक वाचलेलेच असते.) बरोबर होता याची प्रचिती आली Smile

कादंबरीच्या सुरुवातीलाच पुढील ओळी आहेत. (याला पण संकेत म्हणता येईल Wink )

माँगा करें अबसे दुवा हिजरे यार की
आखिर तो दुष्मनी है, असर को दुवा के साथ

वेचा:
=================================================
केलेल्या विनोदावर गंगोबातात्या खूश होऊन स्वतःच हसले; पण दत्तोपंतांच्या चेहर्‍यावरची रेषाही ढळली नाही. गंगोबांनी एकवार आपल्या भेदक नजरेने दत्तोपंतांकडे पाहिले आणि ....
दत्तोपंत खाकरले आणि त्यांनी हाक मारली,
"तात्या!"
गंगोबा वळले.
"काय?"
तात्या, आपल्याला ह्या दरवाज्यातून जाता येणार नाही." दत्तोपंत एकदम म्हणाले.
"म्हणजे?"
"कालच श्रीमंतांची सक्त ताकीद आहे की ज्यांना दिल्ली दरवाज्यातून येण्या-जाण्याचा मान असेल, त्यांनाच प्रवेश द्यावा. तात्या आपण राग मानू नका; पण आपण गणेश दरवाज्यातून जावं हे ठीक."
स्वतःला सावरीत गंगोबातात्या म्हणाले,
"अस्सं अस्सं! ठीक. .... आम्ही गणेश दरवाजाने जाऊ" आणि एवढे बोलून ते भरभर पायर्‍या उतरु लागले. पायर्‍या उतरत असता त्यांच्या पुणेरी जोड्याचा चटचट आवाज उठत होता.
=================================================

स्वामी

रणजित देसाई यांच्या स्वामी या कादंबरीतील हा वेचा असावा. (३०-३५ वर्षापूर्वी वाचलेली कादंबरी असल्यामुळे कदचित बरोबर नसेलही.)

स्वामी

स्वामी. रणजित देसाई.
कादंबरीचा लेखकाच्या यशातील वाटा मोठा, असे सागरने लिहिले आहे ते अगदी बरोबर. माझे चुकत नसेल तर या कादंबरीच्या पुढच्या एका आवृत्तीत रणजित देसायांनी "अहंकाराचा वारा, न लागो माझीया चित्ता" असे लिहून ठेवले आहे.

छे छे.. ते छिन्न का छन्न

छे छे..
ते छिन्न का छन्न प्रतिसाद आता बनवावेच लागणार...
सोपे कोडे होते... आणि आम्ही पाहिच्या आता उत्तर तयार..
निषेध!!! निषेध!! निषेध!!!

निखिल देशपांडे

बेटर लक नेक्श्ट टाईम

निखिल अरे पुढच्या वेळी थोडे अवघड कोडे देईन.
अरे स्वामीतला कोणताही वेचा दिला तरी वाचक आरामात ओळखू शकतात.

४-५ दिवस डोक्याचा भुंगा करणारा वेचा देईन. Laughing out loud

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

@@द्सागर

असाच वेचा दे रे बाबा! वेचा अवघड आहे म्हणून आम्ही कितीही रडारड केली तरीही अवघडच वेचा दे Wink

आणि 'स्वामी' कादंबरीतला कुठलाही वेचा दिला तरी वाचक आरामात ओळखू शकतात या मताला १००%
सहमत आहे!

--अदिती
चिंतनीया हि विपदामादावेव प्रतिक्रिया|
न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे||

--अदिती
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः ॥

पुढचा वेचा अवघड असेन

हो आदिती,

यावेळी नक्की अवघड वेचा देईन. Smile

त्याशिवाय डोक्याला खाद्य कसे मिळणार? नाही का?

अधून मधून सोप्पे वेचे पण देईन. उगाच लोकांचा इंट्रेश्ट जायला नको काय? Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/