'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २०
मुखपृष्ठ
|
".... मी काय म्हणतो ते नीट ध्यानात घे. उद्या तू प्रमुख होशील. तुला त्या सापांवर सत्ता गाजवायची आहे. सत्ता आणि स्वप्ने एकत्र नांदू शकत नाहीत. अशातर्हेने स्वप्न बाळगून राहणारा साप तुझ्या सत्तेखाली सौम्यपणे राहील असे का तुला वाटते? अशातर्हेने मनाला पंख फुटले, की ते संपत्ती काय, सत्ता काय, त्यांच्या जाळ्यात राहू शकत नाही. तेव्हा ज्याज्या वेळी तुला अशा स्वप्नांची बीजे दिसू लागतील, त्यात्या वेळी तू सत्ताधारी या नात्याने ती निष्ठुरपणे ठेचून काढली पाहिजेस. या गोष्टीचा तू स्वत:ला कधी विसर पडू देऊ नकोस.
"परंतु त्याच वेळी आणखी एक गोष्ट तू ध्यानात धरायला हवी. तू सत्ताधार्याप्रमाणेच एक व्यक्तीदेखील आहेस आणि अशा एखाद्या वेड्या, विलक्षण दिवसाच्या आभाळात रात्रीच्या चांदण्या पाहणार्या स्वप्नाखेरीज व्यक्तीच्या जीवनाला मात्र प्राण नाही. तेव्हा स्वत:च्या आयुष्यात मात्र तू असल्या स्वप्नाला फार कोवळेपणाने जपले पाहिजेस. लक्षात ठेव, असले स्वप्न सत्तेने वा बळाने निर्माण करता येत नाही. ज्याप्रमाणे असल्या स्वप्नावर कसली सत्ता चालत नाही, त्याप्रमाणे कोणी त्यांना अटकावदेखील करू शकत नाही; परंतु त्यांची देणगी भयंकर असते, मन सतत जळत राहते, रक्ताचे पाणी होते. जणू हे आधीच पुरेसे नसल्याप्रमाणे, असले स्वप्न येते, ते सोबत अशक्यतेची छाया घेऊनच. सहजासहजी प्राप्त होणार्या, हात उंच करताच आवाक्यात येणार्या स्वप्नांसारखे मलिन, क्षुद्र या जगात काहीच नसेल. जर असले एखादे स्वप्न तुझ्या आयुष्यात आलेच तर त्याचा ताप, त्याची अशक्यता यांसह तू त्याचे आतल्या मनात कृतज्ञतेने स्वागतच कर; नाहीतर आपली निवड झाली नाही, असे स्वीकारून समजूतदारपणा दाखव."
पहिला क्लू (१७.०८.२०१० संध्याकाळ) - अस्सल मराठी पुस्तकातील वेचा आहे..मूळातूनच!
दुसरा क्लू (१८.०८.२०१० सकाळ) - कथासंग्रह
तिसरा क्लू (१८.०८.२०१० दुपार) - लेखक - जी. ए. कुलकर्णी! (सौजन्य : वल्ली)
पास म्हंजे कोडे पास.. मी
पास
म्हंजे कोडे पास.. मी नापास! 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
संकेत द्यायला हवा
काहीच क्लू न देता कसले कोडे घालतेस वेदश्री?
संकेत हवा ना... पुस्तक अनुवादित आहे की पूर्ण भारतीय आहे? चरित्र आहे की कथा-कादंबरी आहे?
काहीतरी हवेच.
वाचल्यासारखे उगीचच वाटते आहे.
माझे तोडलेले तारे: 
अनुवादीत असेल तर सेकंड लेडी - आयर्विंग वॅलेस - अनुवाद रविंद्र गुर्जर
मराठी असेल तर एखादे इंदिरा गांधीच्या जीवनावर चे? - पुपुल जयकरांचे इंदिरा?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
काहीच क्लू न देता??!
काहीच क्लू न देता??! अख्खे २ परिच्छेद दिलेत की राव! कोडे क्लिष्ट आहे हे सिद्ध झाले की मग क्लू वगैरे देण्यात खरी मजा येते. 
वाचल्यासारखे ऊगीचच कसे वाटेल? इथे लिहिलेय मी तेच वाचले असशील की! 
दोन्ही तारे तूटून काहीच फायदा झालेला नाहीये!
इत्तके म्हणतोच आहेस तर देते बापडी एक क्लू.. 
नाय बा वाचलेला हा कथासंग्रह
कथासंग्रहात असा वेचा? मग नाही वाचले मी. कथासंग्रह क्वचित वाचतो मी.
कादंबरी असती तर कदाचित वाचनात आली असती.
हो इथेच वाचले की? विसरलो होतो दोनदा वाचले होते ते 
माझे तारे जमीन पर 
>> देते बापडी एक क्लू.. अहा हा काय मस्त क्लू होता वेदश्री
... वाचलेच नाही पुस्तक तर क्लूचा काय उपयोग.
अवांतर: एखाद्या गाजलेल्या कादंबरीतला वेचा दे की. मग मजा येईल शोधायला 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
:-)
तू हे पुस्तक वाचलेले नाहीयेस हे मला माहितेय पण तरीही उत्तर कळल्यावर.. अर्रर्र.. हे होते का? असे म्हणून 'तू जे वाचतेस त्याबद्दल वाह! झकास!! सुपर्ब!!! वगैरे सोडून काही सविस्तर बोलत नाहीस.' असे म्हणत खार खात माझ्या नावाने कडाक्कड बोटे मोडशील. लिहून ठेव.
संधी प्रत्येकाला मिळते
ठीक आहे ठीक आहे वेदश्री ...
टाईम सबका आता है.. हम भी तो देखे कौनसा पुस्तक है 
मी पण असा एक वेचा देतो ना की तुला वाटेल की वाचले आहे पण आठवणार नाही. थांब अजून २-३ दिवस. तुझ्या वेच्याची खुमारी उतरली की मी देतो नवीन वेचा 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
पहिला क्रमांक - वाचक
वाचक यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे बरोबर उत्तर देण्यात. खरड लिहून उत्तर सांगितले त्यांनी. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 
अवघडच
कथासंग्रहातील वेचे ओळखणे मुळातच अवघड असते. एकतर एकाच कथासंग्रहात अनेक कथा, त्यात एकाच लेखकाचेही अनेक कथासंग्रह. त्यात लेखनशैलीही भिन्न भिन्न वापरलेली असते.
एक अंदाज सांगतो.
लेखक बहुधा जी. ए. कुलकर्णी असावेत.
कथासंग्रह मात्र सांगता येत नाहीये.
लेखक बरोब्बर ओळखलाय!
लेखक बरोब्बर ओळखलाय, वल्ली! आता कथासंग्रहही सांगूनच टाका ना राव. दोन चान्स आहेत की प्रत्येकाला उत्तर सांगायला. वापरून टाका दोन्ही.
सांजशकुन
सांजशकुन 
दुसरे कोणते असणार?
अर्थात हा संग्रह मी वाचलेला नाहिये. अजून वाचायचा आहे
वेदश्री सध्या सांजशकुन वाचत होती या माहितीवर आधारीत आहे हा तर्क...
माझे कर्तृत्त्व शून्य आहे योग्य उत्तर ओळखण्याचे 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
बरोबर पण श्रेय नाही...
दुसरे कोणते असणार म्हणजे काय?! मी जीएंचे रमलखुणा, रक्तचंदन, पारवा वगैरे कथासंग्रहदेखील वाचले आहेत की!! तुझे दोन चान्स तारे तोडण्यात संपले आहेत त्यामुळे बरोबर उत्तर सांगूनही त्याचे श्रेय तुला मिळणार नाहीच!!!
श्रेय नकोच आहे वेदश्री,
श्रेय नकोच आहे वेदश्री,
सांजशकुन एवढ्यात घेऊनही मी अजून ते वाचलेले नाहिये.
पुस्तक वाचले असूनही वेचा मला ओळखता नाही आला तर खूप हळहळ वाटली असती 
तू सांजशकुन वाचते आहेस हे मला माहिती होते , त्यामुळे सहज अंदाज करता आला.
तू म्हटल्याप्रमाणे माझे २ तारे तोडून झाले होतेच. हा तिसरा तारा तोडला 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मग हाच का तो कथासंग्रह?
काजळमाया असावा कारण त्याला ७३ चे साहित्य अकादमीचे पारीतोषिक मिळालेले आहे. त्यामुळे अर्थातच जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध् आहे. मी मात्र अद्याप वाचलेला नाही.
पुस्तक नक्कीच वाचलेले नाहीए
पुस्तक नक्कीच वाचलेले नाहीए
निखिल देशपांडे






पुस्तक वाचलेले नाहीय..
वेदश्रीची कोडी ओळखू न येण्याचे हे ही एक कारण आहे की ती तिने वाचलेल्या पुस्तकांचे इथे परिचय देत नाही. पटकन आठवलेले उदाहरणः करवालो.