'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १६
मुखपृष्ठ
|
डोंगराएव्हढा हे या पुस्तकाचे नाव आहे. सर्वात प्रथम नंदनने व्यनितून आणि नंतर टण्याने खरडवहीतून हे पुस्तक कळवले.
काही न बोलता आम्ही दोघं घराकडं वळलो.
त्यांच्या आग्रहामुळं त्याच दिवशी तिथनं परतण्याचा विचार मी रहीत केला. आपल्यामुळं कुणाला तरी बरं वाटतं या भावनेनं मला अभिमान वाटला!
पण असा मी किती दिवस तिथं राहाणार? त्यांच्या हरवलेल्या मुलाची जागा माझ्यासारखा चार दिवसांचा सोबती कसा घेऊ शकेल?
काही का असेना, माणसांसाठी आसुसलेल्या त्या जोडप्याला काही वेळ तरी मी आनंद दिला या विचारानं मला बरं वाटलं.
माझ्या डोळ्यांसमोरून अनेक दृश्ये तरळून गेली. या निसर्गरम्य परिसरात शंकरम्मा आणि गोपालय्या नवविवाहित म्हणून कसे वावरले असतील? एकमेकांच्या व्यक्तित्वात कसे मिसळून गेले असतील? नव्या जीवनाची वाटचाल करत असताना त्यांनी कशी मधुर स्वप्नं रंगवली असतील? त्यांच्या जीवनात मुलं-बाळं जन्मण्याचा आनंद आणि मुलीच्या लग्नाचा हर्ष कसा उचंबळला असेल? अन् -
- अन मुलीच्या अकाली निधनाचं दुःख त्यांनी कसं सहन केलं असेल?
गोपालय्यांच्या तोंडून ऐकलेली हकीगत आणि माझी कल्पनाशक्ती यांच्या मिश्रणातून घराच्या जवळपास येईतोपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या मुलाची एक आकृती उभी करायचा मी प्रयत्न करू लागलो. का कोण जाणे, पण हा शंभू कधीतरी मला भेटला असावा असं मला वाटू लागलं होतं. कुठल्या तरी क्षणी, कुठे तरी तो मला भेटून गेला असावा. पण तेव्हा तो लहान मुलगा नक्कीच नसणार. तरूण आणि उत्साही! जीवनाला मिळालेल्या एखाद्या वेगळ्याच कलाटणीमुळं त्याला आपल्या आईवडिलांचा विसर पडला असावा.
पण कुठं भेटला असावा तो? कुठल्या गावी?
दुवा १: अनुवाद आहे.
अनुवाद आहे हा दुवा आता कामाचा नाही, कारण अनुवादकाचा नंदनचा अंदाज बरोबर आहे.
दुवा २: कादंबरीच्या मलपृष्ठावरचा मजकूर -
माणसाच्या कुवतीचा उपहास करणारे डोंगर, जमिनीला दुभंगून, मार्ग काढू पाहणारे नवजात ओहोळ, पाच-सहा फुटी मणसाला मुंहीसारखे तुच्छ लेखत उभी असलेली पर्वतशिखरे... सर्वच बाबतींत प्रतिकूल परिस्थिती.
अशा निसर्गाच्या छाताडावर पाय रोवून उभे राहिलेले गोपालय्या आणि त्यांच्या पत्नी शंकरम्मा याचे उन्नत जीवन, हृदयाची तीव्र वेदना, त्याचबरोबर त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी रसपूर्ण कादंबरी.
अंदाज
पात्रांच्या नावावरून दाक्षिणात्य पार्श्वभूमी आहे, हे उघड आहे. त्यामुळे उमा कुलकर्णींचा अनुवाद असावा. भैरप्पांचे पर्व किंवा कारंथांचे मिटल्यानंतर?
अजून
अजून एक अंदाज वर्तवता येईल तुला. हे दोन्ही चुकले. अर्थात, उमा कुलकर्णी हे बरोबर.
हे लिहिलं तेवढ्यात या भल्या माणसानं व्यनि करून पुस्तकाविषयी योग्य अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं कोड्याचा तोच विजेता.
बाकीच्यांनी गेस्टीमेशन सुरू ठेवावे.
डोंगराएव्हढा
डोंगराएव्हढा हे या पुस्तकाचे नाव आहे. सर्वात प्रथम नंदनने व्यनितून आणि नंतर टण्याने खरडवहीतून हे पुस्तक कळवले.
पुस्तकाचे नाव: found no valid post with that title.
असा संदेश येत असल्याने पुस्तक जोडले नाही. अशी पुस्तके यादीत समाविष्ट करावीत.
ही कादंबरी शिवराम कारंथ यांची आहे. अनुवाद उमा कुलकर्णी यांचा आहे. प्रकाशक - मेहता प्रकाशन.
लेखाच्या आरंभी हे लिहिले होतेच. पण ते लक्षात येत नाही असे दिसते. म्हणून आता हा प्रतिसादप्रपंच.






दोन
एका आयडीला दोनच वेळेस कोडं सोडवण्याची संधी. म्हणजेच दोनच गेस किंवा परफेक्ट शॉट एकच.
अर्थात, ही अट माझीच. संस्थळाच्या व्यवस्थापनाची नाही. त्यामुळं मला कोणीही फाट्यावर मारू शकतो.