• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. - १०६

सागर
शुक्रवार, 27 January, 2012 - 19:17
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

संकेतः अतिशय गाजलेले असे हे पुस्तक आहे. लेखनशैलीवरुनच लक्षात यावे. हे पुस्तक म्हणजे लेखकाची ओळख आहे, अजून संकेताची गरज आहे? Wink वेचा बारकाईने वाचा, वेच्यातच भरपूर संकेत आहेत ...

संकेत क्र. १: काही शब्द ठळकवले आहेत त्यावरुन लेखनशैलीचा अंदाज यावा. व त्यातील एका शब्दाने सगळा गुंता सुटावा Wink
संकेत क्र. २: लेखकाने चितारलेले शाळकरी जीवनातले हे पात्र मराठी साहित्यविश्वात अजरामर झाले आहे.
संकेत क्र. ३: लेखकाच्या या पात्रावर बेतलेल्या पुढील कादंबर्‍याही तितक्याच प्रसिद्ध आहे. किंबहुना कादंबर्‍यांच्या नावापेक्षा हे पात्रच लोकांना जास्त माहिती आहे Wink
संकेत क्र. ४: (शेवटचा संकेत) यांना या पुस्तकासाठी व त्याच्या पुढील कादंबरीसाठीही 'महाराष्ट्र राज्य पुरस्कार' मिळाला होता. शिवाय यांच्या आई एक प्रसिद्ध कवयित्री होत्या. (अजून संकेत द्यायची गरज आहे काय Wink )

संकेत गरज पडली तर अवश्य देईनच पण अशोक काका, निवांत पोपट, यशोधरा, वल्ली, ऋ, मिहिर, चित्रा, मणिकर्णिका, मनिष, देवेन्द्र या सर्वांना संकेत न देताही ओळखता यावे. Smile
((चुकून एखादे नाव राहिले तर चुभूदेघे)

बाकी इतर जुन्या सदस्यांपैकी (जसे चिंजंतु, नन्दन, दिगम्भा,इ...इ... ) सर्वांनी पुविवर लवकर हजेरी लावावी ही अपेक्षा

वेचा:
--------------------------------
कालच्या त्या कवितेतल्या ओळी मला आठवल्या:
उथळ वाहे पाणी
नितळ थंडगार
नाचता त्यात फार
मौज वाटे...

सांगितलं की नाही? अगदी माझीच कविता असल्यासारखी. पण तेवढा नाचायचा भाग सोडायला पाहिजे. त्या लाटांचे ते मऊ मऊ हात तुडवायचे? नाही बा. त्यापेक्षा काठावरुनच पाहायला बेष्ट.
तळ्याला वळसा घालून पुढं निघाल्यावर पलिकडून येणारा वारा एकदम कोणता तरी एक खूप खूप जुना वाटणारा, हिरवा वास घेऊन येतो. तळ्याचा, पाण्याचा, गवताचा आणि कसला कसला तो वास आम्हांला आमच्या रांगेतून ओढून तळ्याकडं घेऊन हाईल असं वाटतं नेहमी.
तळं संपलं की मग पुन्हा झाडं, गवत आणि कसली कसली फुलं. मॅडसारखे इकडं तिकडं उडणारे चतुर आणि फुलपाखरं.
तिथून पुढं गेलं की तो तळ्याचा वास बंद. मग ड्रिलचा वास. धुळीचा.
तळ्याच्या काठावरुन जाताना पोरांचा दंगा एकदम बंद. आवाजच नाही. नुसते डोळे इकडं तिकडं. त्या तळ्यांत कोणीतरी एक बाई बुडून मेलेली. ती अजुनी त्या तळ्याच्या पाण्यातच राहते असं शाळेतली पोरं सांगतात. कधी कधी ती तळ्यातून बाहेर येते. मग तिची पावलं तळ्याकाठच्या ओल्या मातीत उठलेली दिसतात म्हणे. अमावस्या असेल त्या मंगळवारी रात्री तळ्याच्या काठावर ती येते आणि तळ्याला फेर्‍या मारते.

--------------------------------

पहिला विजेता आहे मिहिर. संकेत न देताही त्याने ओळखले आहे ... अभिनंदन मिहिर. Smile

दुसरी विजेती आहे मणिकर्णिका. तिनेही संकेत जाहीर करण्यापूर्वी ओळखले... अभिनंदन मणि Smile

तिसरी विजेती आहे चित्रा. तिनेही बरोबर उत्तर ओळखले होते. चित्रा अभिनंदन

चौथा विजेता आहे मनिष. त्यानेही उत्तर बरोबर ओळखले आहे.... अभिनंदन मनिष..

पाचवे विजेते आहेत देवेन्द्र प्रभुणे. अपेक्षेप्रमाणे देवेन्द्र यांनीही अगदी बरोबर उत्तर ओळखले आहे. अभिनंदन देवेन्द्र

सहावा विजेता आहे ऋषिकेश. त्यानेही उत्तर अगदी बरोबर ओळखले आहे. अभिनंदन . Smile

माफ करा. निवांत पोपट यांचेही नाव द्यायचे राहिले. त्यांनी लेखक अगदी बरोब्बर ओळखला होता. फक्त पुस्तकाचे नाव सांगायचे बाकी होते. लेखक ओळखला की पुस्तक ओळखणे काही अवघड नव्हतेच तेव्हा निपो देखील या कोड्याचे विजेते आहेतच.

कोड्याचे उत्तर :
पुस्तकाचे नाव : वनवास
लेखक : प्रकाश नारायण संत ( ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचे सुपुत्र)
आवृत्ती : १२ वी
वेच्याचे पुस्तकातील स्थानः पान क्र. ११३ व ११४
पुस्तकातील अजरामर झालेले पात्र : लंपन
वनवास व शारदासंगीत या २ पुस्तकांसाठी संतांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

वाचले नसल्यास अवश्य वाचा. संग्रहात नसल्यास अवश्य घ्या
बाकी लंपन प्रेमी सांगतीलच
Smile

वनवास या पुस्तकातील काही पाने बुकगंगा साईट वर येथे वाचायला मिळतील

पास!

पुस्तककोडी बघू लागल्यापासून जो 'पास' सुरू आहे तो अजून चालूच आहे. Smile
संकेतामुळे एक-दोन कोडी ओळखली असली तरी ती संकेतामुळे ओळखली होती, वेच्यामुळे नव्हे. Sad तेव्हा या मान्यवरांच्या यादीत असण्याची माझी पात्रता नाही असे म्हणतो.
असो. संकेत येईपर्यंत टीपी करत बसतो.

मिहिर

उद्या संकेत देईनच पण...

मिहिर तू हे पुस्तक ओळखू शकशील असे मला का वाटले ते मी नंतर सांगेन. Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कळल! अंदाज व्यनि करतोय.

कळल! अंदाज व्यनि करतोय.

मिहिर

बरोब्बर आहे

अभिनंदन मिहिर.

आता उत्तर जाहीर करेन तेव्हा तूच सांग की कसे ओळखलेस ते

संकेताशिवाय तू ओळखशील हे माझे मत बरोबर होते की नाही? Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अफलातून वेचा आहे रे

अफलातून वेचा आहे रे मित्रा.
शैली कुठेतरी खूप ओळखीची वाटत असूनही अनोळखीच भासतेय.
एक वाईल्ड गेस करून व्यनि केला आहे.

अजून प्रयत्न कर

वल्ली मित्रा,

वेचा निवडण्यासाठी मी प्रचंड डोके खाजवले, आणि बर्‍याच प्रयत्नाअंती हा वेचा सापडला.
वेचा देण्यासाठी दिगम्भांनी दिलेले निकष पाळण्याचा माझ्यापरीने पूर्ण प्रयत्न केला आहे. Smile

खरे तर वेच्यातच अनेक संकेत दडलेले आहेत. पण उद्या संकेत देईन

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

संकेत दे रे बाबा आता.

संकेत दे रे बाबा आता.

संकेत दिले आहेत

वल्ली मित्रा,

संकेत दिले आहेत. आता सहज ओळखू शकशील. Smile

संकेत देण्याअगोदरच मिहिर व मणिने ओळखले आहे. यावरुन पुस्तक किती प्रसिद्ध आहे याची प्रचिती येते Laughing out loud

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

माझा पास रे. डोकं नुसतं

माझा पास रे.
डोकं नुसतं भिरभिरायला लागलय. Sad

अरे प्रयत्न कर... तू नक्की ओळखशील

अशा प्रकारचे साहित्य तू वाचले नसशील असे मला वाटत नाही. या लेखकाचे हे पात्र खूप प्रसिद्ध आहे.
डोके खाजव. खूप मोठे संकेत आधीच दिले आहेत. तरी अजुन १ देतो

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुस्तक वाचले आहे हे नक्की! पण

पुस्तक वाचले आहे हे नक्की! पण स्मृतीला ताण देऊन सुध्दा उपयोग नाही झाला.आठवतो आहे.

आठवा आठवा

निपो तुम्ही हे पुस्तक नक्की ओळखाल याची खात्री आहे

हे पुस्तक न वाचलेला विरळाच Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नायक ओळखू आला बरं का!

सागर,
हा उतारा कोणत्या पुस्तकातला आहे कुणास ठाऊक! पण एवढे ठळ्ळ्क संकेत दिल्यावर काय, लग्गेच्च ओळखलं बघ!
सध्या इतकी दूर दूर जाते आहे ह्या सगळ्यापासून!

निरोप दिला आहे.

बरोब्बर आहे...

चित्राताई आता पुस्तक पण ओळखा Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

लेखकाचे तसेच पुस्तकाचे नावही

लेखकाचे तसेच पुस्तकाचे नावही पहिल्यांदाच पाहिले. Sad
ओळखू शकलो नाही यात काहीच नवल नाही.
पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दे रे मित्रा.

लंपन नक्की वाच....

वल्ली मित्रा,

१२ व्या आवॄत्तीवरुन पुस्तक कसे असेल याची कल्पना करु शकतोस.

बाकी लंपन वर ऋ, मिहिर, मनिष, मणि, देवेन्द्र, चित्रा या सर्व उत्तर ओळखणार्‍या सदस्यांनी त्यांचे अनुभव सांगावे अशी अपेक्षा आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

निर्व्याज आनंद

या पुस्तकाबद्दल फार काहि लिहिणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. माझ्या अतिशय आवडणार्‍या, सदाहरीत पुस्तकांपैकी निर्व्याज-निखळ आनंद देणारे पुस्तक असे वर्णन मी फार तर करू शकेन.
प्रत्येकाला हवाहवासा लंपन वल्ली यांच्यासारख्या उत्तम वाचकाकडून कसा काय सुटला याचे आश्चर्य वाटले

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

का कोण जाणे पण माहित नव्हते हे पुस्तक

का कोण जाणे पण माहित नव्हते हे पुस्तक पण आता मात्र हे पुस्तक वाचणारच. लवकरच विकत घेईन आता

ऋ शी सहमत आहे

मित्रा,

'ऋ' शी सहमत आहे. लंपन हा वाचून घ्यायचा अनुभवच आहे असे मी म्हणेल.
त्यामुळेच नेमके या पुस्तकाबद्दल नक्की काय लिहावे हाच प्रश्न माझ्याही मनात होता.

नक्की विकत घ्यावे असे पुस्तक आहे. निराशा होणार नाही Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

+१

लंपनचा 'मॅड'पणा असो किंवा 'एकोणीस' तास वगैरे असो, सगळंच इतकं भारी आहे की काय बोलू? बोलावे तितके कमीच या पुस्तकाबद्दल आणि लंपनबद्दल.

मिहिर

या पुस्तकाबद्दल....

वनवासबद्दल येथे वाचता येईल.

यामुळेच घेतले होते

नेमका दुवा दिल्याबद्दल धन्यवाद प्रभाकरजी,

मला हाच दुवा सापडत नव्हता. या धाग्याला पुस्तकाशी आता संलग्न केले आहे (ही कॄपा संपादकांची) त्यामुळे आता वनवास पुस्तक पाहणार्‍यांना वेच्याबरोबर हे परिक्षणही दिसेल

केवळ याच परिक्षणामुळे मी वनवास घेतले होते Smile
आता लवकरच पुढील शारदा संगीत व पंखा घेईन

आणि ऋ, मिहिर व मणि या कोड्याचे उत्तर ओळखू शकतील ही खात्री पण तुम्ही दिलेल्या धाग्यावरील त्यांच्या प्रतिक्रियांमुळे वाटली होती. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

वनवासचा परिचय उत्तम. आता हे

वनवासचा परिचय उत्तम. आता हे पुस्तक घेणे मस्ट.