• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. - १०५

वल्ली
मंगळवार, 17 January, 2012 - 19:52
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

हमखास
 

दहावीच्या वेळीच, गुरुनाथ अभ्यास करायचा, तेव्हा कोणी ना कोणी मित्रा त्याच्याकडे एखादा टोपिच समजावून घ्यायला यायचा. रिव्हिजन होते म्हणून. गुरुही आनंदाने समजावून द्यायला तयार असायचा. आणि गंमत म्हणजे तो ज्या पद्धतीने शिकवायचा, ती इतकी सोपी आणि परिणामकारक असायची की, आलेल्या मित्राला तो टोपिच पुन्हा म्हणून अडायचा नाही! तेव्हाच गुरुच्याची लक्षात आलं होतं की आपल्याला शिकवायला आवडतं.

तो कॉलेजात जायला लागला, तेव्हा त्याची आई गेली होती. बाबा रिटायरमेंटला आले होते. दोघांच करण्याकरता एखादी बाई लावणं गरजेचं होतं. वेळ ओळखून गुरुनं सरळ ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली होती. थेट दहावीपर्यंत तो कोणतेही विषय शिकवू शकायचा. त्यातूनच, त्याची लाईन पक्की झाली होती. शिक्षण-क्षेत्र. आपली आवड-छंद-हाच अर्थार्जनाचा-उपजीविकेचा व्यवसाय होऊ शकला, तर तो करताना, माणूस आवडीने करतो. खंत राहात नाही. पाट्या टाकल्या जात नाहीत.

शिक्षणक्षेत्रात याचचं म्हटल्यावर, इंग्लिश घेऊन बी.ए. केल्यावर गुरुने विचारसुद्धा न करता बी.एड्. ला प्रवेश घेतला होता. तोही, त्याला म्हणूनच मिळू शकला.नाही तर, बी.एड साठीही हल्ली डोनेशन वगैरे लागतं!

वेचा अगदी ताजा असतानाच सागरने पहिल्याच प्रयत्नात अचूक ओळखला आहे. वेच्याचे दुसरे विजेते आहेत देवेंद्र प्रभुणे. दोघांचेही अभिनंदन.
संकेत १: शैक्षणिक क्लासेसचा बाजार मांडण्याच्या अपप्रवृत्तींवर आधारीत एका लोकप्रिय लेखकाची ही छोटेखानी सुरेख कांदबरी आहे.

वेच्याचे उत्तरः कादंबरी- हमखास
लेखक- सुहास शिरवळकर
प्रकाशक-दिलीपराज प्रकाशन
आवृत्ती-ऑक्टोबर २००८
किंमत-८० रू.
वेच्याचे पुस्तकातील स्थान- पान नं २३

उत्तर विरोपवले आहे

उत्तर ओळखले आहे असे वाटतंय Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

तू लगेचच आणि अचूक ओळखशील याची

तू लगेचच आणि अचूक ओळखशील याची खात्री होतीच. Smile

पुस्तकच भारी आहे

वल्ली मित्रा,

या लेखकाची ग्रंथसंपदा विपुल असली तरी हे पुस्तकच एवढे आगळेवेगळे आहे की या पुस्तकाची दखल घ्यावीच लागते. बाकी उत्तर जाहीर झाल्यावर बोलूयात Smile

अवांतरः वेच्यातील गुरुनाथ या नावाचे पात्र सदर लेखकाच्या दुसर्‍या एका कादंबरीतूनही आले आहे Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

आयला, मला आठवत नाही रे, कुठली

आयला, मला आठवत नाही रे, कुठली कादंबरी रे? व्यनित सांग.

छ्या!

छ्या! कधीकधी ही कोडी नकोत वाटतात
एकाचंही उत्तर येईल तर शपथ! Sad

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

संकेत दिलाय रे ऋ

संकेत दिलाय रे ऋ Smile

'हमखास'च वाचावी अशी कादंबरी

आवडत्या लेखकाची कादंबरी ओळखणे हे कधी कधी अवघड पडते. पण ठसा उमटवणारी कलाकॄती असेल तर आठवणे हे उस्फूर्तपणे असते. त्याप्रमाणेच वेच्यातील पहिली ओळ वाचताच 'हमखास' चे नाव डोळ्यासमोर आपोआप आले.

या कोड्याचे उत्तर ओळखल्याच्या आनंदापेक्षा मला जास्त आनंद आहे तो वेगळ्याच गोष्टीचा.

आपल्या पुस्तकविश्वचे कदाचित सुशिंचे माझ्यापेक्षा जास्त फॅन असणारे सदस्य देवेन्द्र प्रभुणें यांचे येथे पुनरागमन पाहून मन सुखावले. आता लवकरच देवेन्द्र कडून एका मेंदूला झिणझिण्या आणणार्‍या प्रश्नमंजुषेची अपेक्षा करायला हरकत नाही Smile

सुहास शिरवळकरांनी 'हमखास' मधून शिक्षणाचा बाजार मांडणार्‍या प्रवृत्तींवर हल्ला चढवला आहे. ही कादंबरी वाचून शैक्षणिक क्लासेसचा बाजार कसा फोफावत गेला हे लक्षात येते. एका बैठकीत वाचून होणारी ही कादंबरी वाचकांनी अवश्य वाचावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे. व्यनिमध्ये वल्लीने मला म्हटल्याप्रमाणे "अगदीच लहान कादंबरी आहे पण तिचा आवाका मात्र मोठा आहे." यापेक्षा जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

+१

असेच म्हणतो. देवेंद्रकडून आता प्रश्नमंजुषेची वाट पाहात आहे. Smile