'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. - १०४
मुखपृष्ठ
|
|
सीमा ओलांडून पलीकडे जाण्याची वेळ येत आहे. पण मला नेण्यासाठी पताका लावलेला रथ येणार नाही. मी जात असता तुतारी निनादावी अगर मला येताना पाहून चौघडे वाजू लागावेत असे काही भव्य मी निर्माण केले नाही. मी लावलेल्या रोपट्यांचे आकाशस्पर्शी देवदार झाले नाहीत, की माझ्या शब्दांनी दिव्यत्वाशी नाते जोडणारे महाकाव्य निर्माण झाले नाही. येथे माझ्यासाठी महाद्वार उघडले जाणार नाही. माझा साराच प्रवास धुळीतून अनवाणी पावलांनी झाला आहे. परंतु माझ्यासाठी लहान दिंडी उघडणार्या द्वारपालांनो, मी हीन-दीन दरिद्री होऊन तुमच्याकडे आलो नाही, ही गोष्ट ध्यानात असू द्या. सर्वत्र पसरलेल्या जळजळीत सूर्यप्रकाशात, क्षणभर तरी का होईना, मी माझा स्वतःचा एक लहान तारा पाहिला आहे. समुद्रात बुडालेल्या द्वारकेची एक गोकुळसरी मी क्षणभर त्याच्या सूर्यवैभवात पाहिली आहे. येत असताना माझे हात रिकामे दिसले तरी रिते नाहीत. त्यांच्या बोटांना मारव्याचा वास लागला आहे. त्यांनी भरवलेला घास घेताना काही अगदी लहान मुलांना फार आनंद झाला आहे. लाल डोळ्यांचा एक पक्षी त्यांच्यावर फार प्रेमाने आणि विश्वासाने उतरला आहे. मी एक क्षुद्र याचक म्हणून येथे येत नाही. मी माझ्या पायभार खेड्यासाठी विनादैन्य येथे पाऊल टाकत आहे.
पहिला विजेता - सागर
दुसरा विजेता - अशोक पाटील
संकेत १ - ह्या पुस्तकाच्या लेखकाने सहसा लांबलचक कथा लिहिलेल्या वाचायला मिळतात पण त्यांच्या छोट्या कथा या पुस्तकात जमवलेल्या वाचायला मिळतात.
बरोबर!
माझा विश्वासच बसत नाहीये की हे पुस्तक चक्क तू ओळखले आहेस, सागर! तुझे तूच ओळखलेस ना की कोणी सांगितले तुला? 
उत्तर एकदम बरोबर आहे!
मीच ओळखले आहे याला एक खास कारण आहे
या पुस्तकातील दुसरा वेचा दिला असतास तर कदाचित ओळखले नसते वेदश्री.
पण नेमका शेवटचा निरोप तू वेचा म्हणून दिलास अन् नेमके तेवढेच माझ्या लक्षात राहिले होते
माझी खात्री आहे की हे पुस्तक ज्यांनी वाचले त्यांना बाकीचे जास्त आठवणार नाही एवढे हे शेवटचे दीड पान लक्षात असेल
अजून लिहित नाही कारण मग लोकांना लगेच लक्षात येईल. सध्या तरी मी त्या दीड पानाच्या आठवणीने पाणावलोय
दिगम्भा पण हे पुस्तक पहिली ओळ वाचूनच ओळखतील याची १००% खात्री आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
लेखक बरोबर, पुस्तक चुकले
लेखक बरोबर ओळखलायस पण पुस्तक चुकले.
निवांत पोपट
निवांत पोपट यांनीदेखील लेखक अचूक ओळखला आहे. पुस्तकही ओळखा आता. 
नक्की वाचलेले नाही!
पुस्तक नक्की वाचलेले नाही!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
छुपा रुस्तम!
पुस्तक वाचलेले नसतानाही लेखक मात्र अचूक ओळखलास की! आता पुस्तकही ओळख.
पा..स!
वेदश्री,
माझा पास. ह्यावरुन लक्षात आले की आपले दोन्ही `पुवि' मित्र सागर आणि निपो... पुस्तके भारंभार विकत घेतात आणि वाचतातसुध्दा...
उत्तर तसे सोपे आहे
या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे या लेखकाचे हे पुस्तक लक्षात राहतेच राहते.
मृत्युबद्दल एवढे हलवून सोडणारे लेखन क्वचित पहायला मिळते आणि लेखकाचा वेच्याशी घनिष्ठ संबंध आहे, म्हणून लक्षात राहते.
वेदश्रीने उत्तर जाहीर केल्यावर ती आणि निपो सविस्तर सांगतीलच.
तेव्हा तुम्हा सर्वांना हळहळ वाटेल की हे पुस्तक का नाही वाचले
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मनिष
मनिष नेदेखील लेखक बरोबर गेस केला आहे. पुस्तकही ओळखा की आता!
वेचा
पुस्तकविश्व नव्या उत्साहाने सुरू झाल्यची एक चांगली वार्ता सागरने फोनवरून मला दिली. आज इथे आलो तर अगदी अत्यंत आवडत्या लेखकाच्या खजिन्यातील वेचा समोर.
व्य.नि.ने उत्तर कळविले आहेच.
अशोक काकांना विनंती
अशोक काका,
माझी विनंती आहे की जी.एं.च्या या अत्भुत पुस्तकाविषयी खास करुन या शेवटच्या 'निरोपपाविषयी' तुम्ही सविस्तर सांगावे. वेदश्रीने उत्तर तर जाहीर केले आहेच, त्यामुळे आता या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चा करण्यास हरकत नसावी 
"कुसुमगुंजा" तील शेवटचा निरोप हे जी.एं.च्या ध्वनिफितीवरुन घेतलेले आहे. असे अंधुकसे आठवत आहे. जीएंनी स्वतःच्या मृत्यूबद्दल केलेले हे भाष्य होते.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अशोक पाटील
अशोक पाटील यांनी लेखक आणि पुस्तकदेखील अचूक ओळखले आहे! अभिनंदन!!
हा वेचा निवडण्यामागचे कारण
वेदश्री,
हा वेचा निवडण्यामागचे कारण तुझ्याकडून ऐकायला आवडेल. या पुस्तकातील अनेक कथा छान आहेत, पण हा शेवटचा निरोप वेचा म्हणून निवडण्यामागचे कारण जाणून घ्यायला आवडेल 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
लेखक ओळखला, पण नाव चुकले.
लेखक ओळखला, पण नाव चुकले. लिहा सविस्तर जरा.. 
अवघडच होते.
लेखक ओळखला तरी हे पुस्तक कधीच ओळखू शकलो नसतो.
पुस्तकाचे हे नाव पहिल्यांदाच ऐकलेय. पुस्तकाविषयी अधिक ओळख हवीच.






वेच्याची सुरेख निवड
लेखनशैलीवरुनच लेखकाचा अंदाज यावा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/