• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे? क्र. १०३

सागर
बुधवार, 4 January, 2012 - 20:49
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

राधेय
 

संकेत देण्याची गरज पडू नये. Smile

---------------------------------------------
आकाशीचा चंद्र पृथ्वीवर उतरला. सूर्यकिरणाने काळोख पसरला. अग्नीने जलधारांत स्नान केले. अमृताला मद्याची ग्लानी आली. वायू अचल बनला. वज्राची एकतारी झाली. द्रौपदी कौरवांची दासी झाली. पांडवांच्या हाती गमवायला आणि कौरवांना मिळवायला काहीही शिल्लक राहिले नाही.

आनंदभरित राजसभेकडे समाधानाने पाहत शकुनि उभा राहिला. वार्धक्यामुळे आणि झालेल्या हर्षाने त्याची मान हलत होती. त्यामुळे शिरोभूषणातले रत्नजडित शिरपेच अधिकच झगमगत होते. आपल्या डाव्या मनगटावर विळखा घालून अधांतरी रुळणार्‍या पीतवर्ण शेल्याच्या शेवाने शकुनि वारा घेत होता. ती उंच, शेलाटी, गौरवर्ण आकॄती आपल्या भेदक घार्‍या डोळ्यांनी पराजित पांडवांची दयनीय स्थिती निरखीत होती.

शकुनिने मंचावरच्या आपल्या अंगठ्या उचलल्या. शांतपणे त्या बोटांत पूर्ववत चढवल्या आणि पांडवांकडे अंगुलिनिर्देश करुन क्षणभर तसाच उभा राहिला.
त्या कृतीने सभेतील आवाज विरला.
पसरलेल्या शांततेची उसंत घेऊन शकुनिचा आवाज त्या सभेमध्ये उठला,

"कौरवश्रेष्ठहो! द्यूतामध्ये ऐश्वर्यासह राज्य गमावून आधीच एकवस्त्र बनलेले हे पांडव आता पणाला द्रौपदी हरुन अर्धवस्त्र बनले आहेत. या दानानं द्रौपदी कौरवांची दासी झालीय्. या क्षणापुढं कृष्णेच्या दौवाचे फासे फक्त कौरवांच्या इच्छेवर अवलंबून आहेत."

---------------------------------------------

अपेक्षेप्रमाणेच या कोड्याचा विजेता आहे "वल्ली"
वेच्याची शाई सुकायच्या आत त्याने बरोबर उत्तर ओळखले आहे ... अभिनंदन Smile

पुस्तकाचे नाव : राधेय
लेखक : रणजित देसाई
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती : ऑगस्ट, २०११ चे पुनर्मुद्रण
वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्र. ९५

महारथी कर्णावरच्या जीवनावरचे हे अजून एक सुंदर पुस्तक आहे. मृत्युंजय प्रमाणेच ही देखील कादंबरी वाचकांना आवडेल.

व्यनि केलाय रे मित्रा. वेचा

व्यनि केलाय रे मित्रा.
वेचा फार घाईघाईत टंकलेला दिसतोस.

बरोबर आहे

होय मित्रा,

खरे आहे. वेचा ऑफिसातून घरी येण्यापूर्वीच दिला होता , त्यामुळे टंकाटंकी जलद केली आहे Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/