'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे? क्र. १०२
मुखपृष्ठ
पुस्तक जोडलेले नाही
पुस्तक
पुस्तक जोडलेले नाही
भाषण क्र. दोन
आज पंधरा ऑगस्ट नाही का सव्वीस जानेवारी नाही. पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आस्ती तं आपुन झेंडा फडकवला आस्ता. आज झेंडा फडकवायचा दिवस नाही. आज दोन मिन्टं शांत उभं राहून श्रद्धांजली द्यायचा दिवस हाये. आधीच्या वक्त्यानं सांगतलं की आजच्या दिवशी गांधीजीचा खून झाला. तो कोण माथेफिरू गोडसे का घोडसे त्यानं गांधीजीचा खून केला. गांधीजी चाल्ले व्हते आरामशीर प्रार्थनेले. हा समोरून आला बाहाद्दर... गांधीजीकडं पाहिलं... पिस्तूल काढली... ढिश्यूम... ढिश्यूम...ढिश्यूम...तीन गोळ्या सोडल्या एकामागून एक. गांधीजी पडले खाली. तोंडात... हरे राम हरे राम राम राम हरे हरे. आणि हे हरामखोर गेलं पळून. लगेच जिकडं तिकडं बातमी गेली. कोणंतरी कस्तुरबाले जाऊन सांगतलं. कस्तुरबा पळतच आली. लांबूनच हंबरडा फोडला त्या माऊलीनं. गांधीजी खाली पडेल. सगळीकडे रगतच रगत. कस्तुरबा चार चार बायाहीले आवरत नव्हती. गांधीजीच्या आंगावरच जाऊन पडायला करे. छाती पिटे, डोकं झोडे. धाय मोकलून म्हणे... महा बाप्पू गेला वं... महं कपाळ फुटलं बाप्पा... मी माघं राहून काय करू आत्ता... मह्याबी छातीत गोळ्या घाला बाप्पा... मोठा कठीण प्रसंग होता त्यो. तर आशा या आजच्या दिवशी या थोर पुरुषाले श्रद्धांजली म्हणून दोन मिन्टं शांत उभं राहायचा कार्यक्रम आपल्या सार्या देशात साजरा करतेत. ठीक आकरा वाजता सगळा देश दोन मिन्टं शांत उभा राह्यतो. सगळे जणं आपल्या हातचे कितीबी अर्जंट काम आसो ते सोडून जिथल्या तिथं शांत उभे राह्यतात. माण्सं तं उभे राह्यतातच पण रस्त्यावरच्या गाड्या दोन मिन्टं थांबतात, आगगाड्या थांबतात. एवढंच नाही तं वर आभाळात उडणारे विमानंबी थांबतात.
अंदाज व्यनि केला आहे
वेच्याची सुरुवात वाचतानाच एकच लेखक डोळ्यांसमोर आला.
कविताजी, उत्तर (अंदाजाने) व्यनि केला आहे 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
पुविचे सदस्य कुठे अदृष्य झाले
कविताजींनी एवढे स्पष्ट संकेत दिले असून याचे उत्तर पुवि च्या इतर सदस्यांना येण्यास हरकत नसावी
वल्ली, ऋषिकेश, अशोक काका, चित्रा, निपो, मनिष, ऑरागॉर्न, मेघना, दिगम्भा, मिहिर, यशोधरा, मस्तकलंदर हि सर्व मंडळी कुठे गेली न कळे ... 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मी पण वेच्याचे उत्तर व्यनि
मी पण वेच्याचे उत्तर व्यनि केले आहेच.
व्यनि केलाय
कुठे गेलो नाही ओ! बघून काही अंदाज आला नव्हता म्हणून लक्ष दिले नव्हते.
संकेतांनंतर अंदाज व्यनि केला आता.
मिहिर
वेलकम मिहिर
तेच म्हटले नियमित असलेली सदस्य मंडळी अदॄष्य व्हायला लागल्यावर काय करायचे? 
स्वागतम् सुस्वागतम्
कविताजींनी एकदम ठळक संकेत दिले आहेत. मला मात्र संकेत वाचण्याआधीच लेखनशैलीवरुन क्लिक झाले 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अंदाज येत नाही
मुळातच वाचन कमी असल्याने अंदाज येत नाही, पण उत्तर जाणुन घ्यायला आवडेल.
अवांतरः ही भाषा विदर्भातली का खानदेशातली ?
वेचा बरेच काळ भिजत पडलेला
वेचा बरेच काळ भिजत पडलेला असल्याने त्याचे उत्तर येथे जाहिर करत आहे. (वेच्याचे उत्तर जाहिर केल्याबद्दल कविताताईंनी कृपया रागावू नये.)
उत्तर: सर्व प्रश्न अनिवार्य
लेखक: रमेश इंगळे-उत्रादकर (त्यआंची पहिली कादंबरी निशाणी डावा अंगठा ही होती.)
ही बहुधा वैदर्भीय बोली आहे.





संकेत
संकेत १. लेखकाची ही दुसरी कादंबरी आहे.
संकेत २. पहिल्या कादंबरीला अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले होते व तिच्यावर चित्रपटही निघाला होता.
संकेत ३. मुळात कविता लिहिणारे काही कवी दरम्यानच्या काळात कादंबर्या लिहू लागले. त्यांपैकी हा एक कवी असलेला कादंबरीकार आहे.
संकेत ४. एका वाड्मयीन मासिकाचं संपादनही हे लेखक करतात.