'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू वेचा कोणत्या पुस्तकातील आहे- भाग १२
मुखपृष्ठ
|
:
:
पण त्याच्या रसात प्राण हरण करण्याची शक्ती होती. किती तर्हा किती प्रकार. किती वनौषधी. काही प्राणदायक तर काही प्राणघातक. 'न वृक्षं अनौषधम्.' औषध नसलेलं झाड नाही म्हणतात ते अगदी पटत होतं. पाहत पाहत पुढे चाललो होतो. झाडांखेरीज दुसरं काही दिसत नव्हतं. ठेचेठेचेवर त्यांची मुळं. समोर प्रचंड खोडं. सगळं अबोल. सगळं मूक.
हे रान तसं एकाएकी आपल्याशी बोलत नाही. आपल्या हातच्या खास चिजा दाखवत नाही. त्यासाठी त्यच्याशी खूप सलगी व्हायला हवी. आपलं नवखेपण झिजायला हवं. दाट परिचयानंतरच हे घनदाट अरण्य स्वतःची मुलं म्हणून आपल्याला जवळ घेतं, आदोनायसारखं. त्याला जवळचं लांबचं सगळं अचूक दिसत होतं. ऐकायला येत होतं. रानाची सळसळ किंवा पक्ष्यांचे सरमिसळ आवाज त्याच्यासारखे मधून मधून आमच्याही कानी पडायचे, पण त्यानं ते एकेक उलगडून दाखवल्याशिवाय समजायचे नाहित. मधाची पोळी, पक्ष्यांची घरटी, गळाफुगवे बेडूक, सळकन पळणारे सरडे, उड्या मारणारी वांदरं त्याला चटकन दिसायची. आम्ही पाहू पाहू म्हणेतो ती अदृश्य होत. रा रानात दिवसासुद्धा काही दिसणं किती कठीण होतं.
त्या वेळी टीव्हीच्या डिस्कव्हरी वगैरेंवरची निसर्गचित्रणं आठवली. पक्षी वा प्राणी हेरणं, त्याला नेमकं कॅमेरावर पकडणं हे किती जिकीरीचं काम आहे, एक अचूक क्षण पकडायला त्यांना महिनो न् महिने कसे वेचावे लागत असतील हे समजून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. पण कार्यक्रम कितीही उत्तम असले तरी टीव्हीच्या अडीच गुणिले दोन फूट पडद्यापुढे आरामखुर्चीत बसून ते बघणं वेगळं आणि या अथांग रानात ते स्वतः अनुभवणं निराळं. पडद्यावरल्या सिंहापेक्षा प्रत्यक्षातला ससा काय थरथर देऊन जातो!
इथले वास, रंग, आकार पंचेंद्रियांना खडबडून जागं करत होते. त्यांचं अस्तित्त्व जोरकस करत होते. नजर पोचेतो रान पसरलं होतं. चालताना घसरायला होत होतं. तोल सावरताना नेमकं काटेरी झुडुप हाती येत होतं. ठेचा लागत होत्या. वेलींचे दोर दंडातोंडाला घासून जात होते. कीटक कानाशी गुणगुणत होते, उघड्या भागाचा चावा घेत होते. चादरीसारख्या लपेटलेल्या हवेमुळं स्वतःचाच घामटतिखत वास येत होता. अजून प्राणी वगैरे फारसे दिसत नव्हते, तरी एका अमर्याद आनंदानं भरून यायला होत होतं. अशी उत्फुल्लता टीव्हीच्या एकाही कार्यक्रमानं कधी पदरी टाकली नव्हती.
:
:
मलाही
मलाही नेमचे हेच वाक्य सगळ्यात आवडले होते म्हनून वेचा दिला 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अरेच्या इतकी शांतता या धाग्यावर?
ज्यांना हे कोणत्या पुस्तकातले आहे ते माहित नाहि त्यांनी वेचा कसा वाटला ते सांगितलं तरी चालेल 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
बेष्ट
बेष्ट आहे !!
>>हे घनदाट अरण्य स्वतःची मुलं म्हणून आपल्याला जवळ घेतं, आदोनायसारखं.
आदोनाय म्हणजे काय ? बाकी वर्णन बेष्ट आहे, मराठीत जंगलकथा म्हटले की मारुती चितमपल्लीच आठवतात. डिस्कव्हरी चॅनल आणी कथानायकाचा जंगलातला नवखेपणा पाहुन लेखक कोणी वेगळाच असावा ही खात्री झालीये.
बाकी या ओळखा पाहु धाग्यांचे ही थोडीशी चव चाखायला देणे आवडते, सुग्रणीने पुरण झाल्यावर, पोळ्या होण्याआधीच लेकरांच्या हातावर छोटे पुरणाचे गोळे दिल्यासारखे !!
मराठीत जंगलकथा म्हटले की
करेक्ट!
मलाही असेच वाटले होते. 
उत्तर
असो. काहिंनी व्यनीतून प्रयत्न केले. पण त्यांची उत्तरे चुकली.
आता उत्तर देतो. हे पुस्तक आहे "दक्षिणरंग" लेखिका "मीना प्रभू" 
हे जंगल आहे अॅमेझॉनच्या भोवतीचं घनदाट विषुववृत्तीय जंगल... आदोनाय हा लेखिकेचा या जंगलातील वाटाड्या असतो... अख्ख्या परिच्छेदात "आदोनाय" हा एकमेव शब्द क्लू होता.. नाहितर परिच्छेद कुठल्याही पुस्तकाचा/जंगलाचा म्हणून खपला असता 
वरच्या परिच्छेदाच्या लगेचचा पुढचा छोटा परिच्छेदही छान वाटला तो इथे समारोप म्हणून देत आहे:
ही भूमी, हे रान जिवंत होतं, त्याचा मी एक भाग झाले होते. मुळात मी त्याचाच एक भाग होते. शतकोशतकांपूर्वी मी त्याच्यापासून अलग झाले. एक कृत्रिम संस्कृती उभारण्यात दंग झाले. तिच्यात अपरंपार रमले. पण रक्तातली ही आदिम ओढ कुठंतरी शिल्लक होती. तिच्या अस्तित्त्वाची खास जाणीव मलासुद्धा नव्हती. ती आता उफाळून आली होती. किती पाहूस वाटत होतं
खरंच! मलाही जंगलात/ट्रेकला गेलं की अस काहिसं वाटायचं / वाटतं म्हणून परिच्छेद खूप आवडला
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
चुकलेले कोण आहेत?
>असो.
असं कसं असो? नाही नाही... नहीं चलेगी नहीं चलेगी.. गुंडागर्दी नहीं चलेगी!
>काहिंनी व्यनीतून प्रयत्न केले. पण त्यांची उत्तरे चुकली.
'काहिंनी' नाही चालणार. एक्झॅक्ट नावे पाहिजे!
>आता उत्तर देतो. हे पुस्तक आहे "दक्षिणरंग" लेखिका "मीना प्रभू"
कोणे रे तिकडे? कोणकोण होते स्वघोषित दक्षिणरंग वाचलेले? आणून हजर करा एकेकाला.. न्यायनिवाडा करावा लागेल खरंच वाचलेय की नाही त्याचा! त्यात आणखीन चुकलेल्यांमध्ये असे सापडले तर पारायण करण्याची शिक्षा द्यावी लागेलच की! 
मी स्वतः इमानेइतबारे दक्षिणरंग आणून वाचणारच आता. पुपबद्दल १०क्स, ऋ! 
अवांतरः
ऋ, वेगळ्या रंगात कसे काय लिहिता येतेय तुला? मला तसे टॅग्स दिसत असले तरी इफेक्ट कधीच दिसला नाही आजवर मी जेव्हाजेव्हा पांढर्या रंगात लिहायचा प्रयत्न केला तेव्हा.






झकास!
ऋ, उतारा कुठल्या पुस्तकातला आहे ते माहिती नाही पण झकास आहे. वेचानिवड अत्यंत आवडली. व्यसंची योजना.... काही टिप्पणी करत नाही, अजमावून बघ.
>पडद्यावरल्या सिंहापेक्षा प्रत्यक्षातला ससा काय थरथर देऊन जातो!
वेच्यातले हे अगदी खास आवडलेले वाक्य.
स्वगतः अशा रानात जायचा कधी योग येईल तर धम्माल येईल!