'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -९
भाग-८ दुसर्या पानावर गेला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.
आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले.
मी आज खालील पुस्तके विकत घेतली.
१. धर्मश्री- एस. एल. भैरप्पा - अनु. सौ. विजयालक्ष्मी रेवणकर
प्रकाशक-काँटीनेंटल प्रकाशन
आवृत्ती- २री
किंमत १०० रू.
२. द हॉबिट - जे. आर. आर. टॉल्कीन - अनु. मीना किणीकर
प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन्स
आवृत्ती - १ली
किंमत - ४९५ रू. (सवलतीत ३७० रू. ला मिळाली)
टॉल्कीनच्या जगप्रसिद्ध लॉर्ड ऑफ द रिंग्स कादंबरीचा हा पूर्वरंग. यात बिल्बो बॅगिन्स हा हॉबिटचा डार्क लॉर्ड सॉरोनची जादूई अंगठी गॉलम कडून कशी मिळवतो, स्मग द ड्रॅगनचा खजिना कसा लुटतो हा भाग सुरेखरित्या यात चितारला गेला आहे. ऑस्कर विजेते चित्रकार अॅलन ली यांच्या रंगीत चित्रांचाही या आवृत्तीत समावेश आहे.





शतकमहोत्सवी वेच्यानिमित्ताने झालेली खरेदी
वल्ली मित्रा,
धर्मश्री कसे आहे ते वाचून झाले की नक्की सांग. भैरप्पांचे पुस्तक आणि पहिल्यांदाच उमा कुलकर्णीं ऐवजी दुसर्या अनुवादिका आहेत म्हणून थोडी उत्सुकता आहे. काही लिहू शकलास तर मस्तच
बाकी हॉबिट बद्दल ऐकले आहे पण पाहण्याचा योग कधी आला नाही. लॉर्ड ऑफ द रिंग्स ही चित्रपटाची तिकडी मला जाम आवडली होती. पुस्तकातला सरसपणा चित्रपटांतून जसाच्या तसा उतरल्याचे अनेकांकडून ऐकले आहे. मी इंग्रजी पुस्तकांच्या फार वाट्याला जात नाही तरी चित्रपटांतून लॉर्ड ऑफ द रिंग्स काय भन्नाट चीज आहे हे माहिती आहेच.
तुझ्याकडुन याही पुस्तकाबद्द्ल वाचायला / ऐकायला आवडेल. अनुवादित पुस्तके हा माझाही आवडीचा प्रांत आहेच
शतकमहोत्सवी वेच्यातील कविता प्रकाराची तयारी मला करायची होती म्हणून त्यावेळी घेतलेली पुस्तके कोणती? ते आता देतोय.
१. पानझड - ना. धों. महानोर - रु. ६०/- (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त )
२. पावसाळी कविता - ना. धों. महानोर - रु. ६०/-
३. छंदोमयी - कुसुमाग्रज - रु. ६४/-
याव्यतिरिक्त ही पण घेतलीत.
४. नटसम्राट (नाटक) - वि.वा. शिरवाडकर रु.८१/- (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त )
५. असा मी असामी - पु.ल. देशपांडे रु. ४५/- (२५ वी आवॄत्ती)
६. व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. देशपांडे रु. ७५ /- (३५ वी आवॄत्ती) (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त )
७. मराठी वाड्मयाचा (गाळीव) इतिहास - पु.ल. देशपांडे रु. ५३ /- (१० वी आवॄत्ती)
८. कलेचे कातडे - आनंद यादव - रु. १९०/-
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नक्कीच
पुस्तकांबद्दल नक्कीच लिहिन रे.
वास्तविक धर्मश्री हे जुने पुस्तक आहे. कदाचित उमा कुलकर्णींनी भैरप्पांच्या पुस्तकांच्या अनुवाद सुरु करण्याआधीचा हा अनुवाद आहे.
'द हॉबिट' हा चित्रपटही २ भागात २०१२/१३ मध्ये येत आहे. त्याचा दिग्दर्शकही लॉर्ड ऑफ द रिंग्ज चा पीटर जॅक्सनच आहे.
बाकी कलेचे कातडे म्हणजेच व्यंकटेश माडगुळकरांवरील टिकात्मक पुस्तकच आ? ते मिळत नव्हते मध्ये बरेच दिवस. वाचून झाल्यावर सांग कसे आहे ते.
होय तेच ते
होय रे मित्रा,
कलेचे कातडे तेच पुस्तक आहे ज्यातून व्यंकटेश माडगूळकरांवर यादवांनी शरसंधान केले आहे. ही एक कादंबरी असली तरी व्यंकटेश माडगूळकरांसारखे एक व्यक्तीचित्र त्यात आहे. संपूर्णपणे त्यांनाच टारगेट करुन ही कादंबरी असेल असे मला अजिबात वाटत नाहिये. तरी वाचल्यावर सांगेनच कसे आहे ते त्याबद्दल.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ऑर्डर
सागर ~
छानच खरेदी. मी देखील 'राजे' कडे ऑर्डर नोंदविली आहेच मागील आठवड्यात. बहुधा आजउद्या ती पुस्तके येतील असे वाटते. आल्यावरच इथे यादी देतो.
[अवांतर : तुझ्या वरील यादीत 'पु.ल.देशपांडे' अशी दुरुस्ती कर ~ "लं" नको.]
यादी देऊन टाका
अशोक काका,
यादी देऊन टाका की. पुस्तके तर मिळणारच आहेत तुम्हाला

या धाग्याप्रमाणेच सध्या काय वाचताय हा धागा पण प्रतिसादवा ना काका
अवांतरः टंकन चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद, चुकीची दुरुस्ती केली आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
पाडस
आताच फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले 'पाडस' आले. कधी एकदा सुरू करतोय असे झालंय. हे जर्नल एकदा लिहून झाले की घेतोच लगेच.
मिहिर
छान खरेदी
मिहिर मित्रा,
छान खरेदी केलीस.
पाडस वाचून झाले की तुझा अनुभव नक्की सांग. माझी खात्री आहे की 'पाडस' चा प्रवास सुरु झाल्यापासून संपेपर्यंत तू आश्चर्याने थक्क होशील
मी एवढ्यात काही खरेदी केली नाहिये, दिवाळी अंकांची खरेदी करणार आहे, पण त्यासाठी वेगळा धागा काढत आहे तेथे चर्चा करुयात.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
बेष्ट!!!!
बेष्ट!!!!
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
मी
मी पण फ्लिपकार्टवरून सोमवारी ऋजुता दिवेकरांचे 'डोन्ट लूज युअर माईंड, लूज युअर वेट' हे उज्वला बर्व्यांनी अनुवाद केलेले पुस्तक मागवले होते. ते काल दुपारी घरी येउन पोहोचले.
आता वजन कमी करायच्या मागे लागायला हवं.
लाख मोलाची गोष्ट बोललास
आता वजन कमी करायच्या मागे लागायला हवं.
मित्रा अगदी लाख मोलाची गोष्ट बोललास
तहान भूक विसरुन पुस्तकांमध्ये बुडून जा म्हणजे पुस्तकांचं आणि तुझं दोघांचंही वजन कमी होईल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
Pride and Prejudice आणि १९८४
आजच Pride and Prejudice हे माझे प्रचंड आवडते पुस्तक मागवले. जेन बाईंच्या सगळ्या पुस्तकांपैकी या कादंबरीइतके मानवी मनाच्या कंगोर्यांना क्वचितच कोणी टिपले असेल. त्यातही या कादंबरीतील नाट्य, रसाळ आनि नेमके संवाद आणि अप्रतिम इंग्रजी शब्दोपयोग यामुळे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी दरवेळी नव्याने आवडू लागते.
या शिवाय अनेकदा ऐकलेले मात्र वाचायचे राहुन गेलेले (व लायब्ररीतही न मिळाल्याने) 1984 हे ऑर्वेलसाहेबांचे पुस्तकही मागवले आहे.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
मी पण ऑर्डरवले आहे
ऋ,
हे पुस्तक फ्लिपकार्टवर खूप स्वस्तात मिळते आहे. आणि हे सुंदर पुस्तक माझ्या संग्रहात राहिले होते.
तुझ्यामुळे या पुस्तकाची आठवण झाली याबद्दल थेंकू
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
मीही ही दोन्ही पुस्तके
मीही ही दोन्ही पुस्तके फ्लिपकार्टावरूनच मागवली आहेत. दोन्ही मिळून १०० रु. मधे काम झाले
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
माझे पण
पुस्तके आजच हातात मिळाली
माझी आतापर्यंतची सर्वात स्वस्त खरेदी असावी ही
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नुकतीच
फ्लिपकार्टवरून खालील दोन पुस्तके मागवली २ दिवसात थेट घरपोच.
१) स्वामी-रणजीत देसाई- रू. १९० चे १४३ ला मिळाले.
२)स्क्रीन काळा मोठा गोळा - नचिकेत गद्रे (मिपावरचे गवि) - स्फूट लेखांचा (ब्लॉग्सचा संग्रह) रू. १०० चे ५० ला मिळाले.
मी पण
रणजित देसाईंचे मी पण एक घेतले आहे
- राधेय
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नविन काही
मोतीलाल बनारसीदास कडून 'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' -डॉ शिवस्वरूप सहाय मागवले आहे.
३/४ दिवसात मिळायला हरकत नाही.
दुवा: http://www.mlbd.com/BookDecription.aspx?id=3435
उत्तम खरेदी
पुरातत्त्व , पुरालेख हा विषयच मोहीनी घालणारा आहे.
हिंदीतून जेवढे या विषयांवर मुबलक साहित्य उपलब्ध आहे तेवढे दुर्दैवाने मराठीत नाहीये.
मी काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व आणि पुराभिलेख यांवर थोडी शोधाशोध केली तेव्हा मोजकीच पुस्तके मिळाली
सुदैवाने गूगल बुक्स वर हे पुस्तक वाचायला उपलब्ध आहे त्यामुळे नक्की वाचेन हे पुस्तक
सगळी पाने उपलब्ध नाहियेत पण यावरुन पुस्तकाची कल्पना यावी
पण वल्ली मित्रा, तुझ्याकडुन या पुस्तकाविषयी अधिक माहिती करुन घ्यायला आवडेल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नक्कीच
गूगलबुक्सचा दुवा मी पण पाहीला होता. पण सर्व पाने नसल्याने हे पुस्तक ऑर्डरवले आहे.
पुस्तकाच्या माहितीसाठी एक मिपाकर सदस्य विसुनाना यांचे खास धन्यवाद.
पुस्तक हातात आले की नक्कीच येथे परिचय देईन.
या पुस्तकाच्या परिचयाची वाट पाहीन
खरे आहे मित्रा,
सगळी पाने हातात असल्यावरच मजा येते. या पुस्तकाच्या परिचयाची मी नक्की वाट पाहीन
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
The Book Of Indian Birds
एका बहिणीला भाऊबीजेसाठी सलीम अलींचे 'The book of Indian Birds' ची १३वी एडीशन मागवली. घरी आल्यावर इतकी आवडली की स्वतःसाठी अजून एक प्रत मागवायच्या विचारात आहे.
सुंदर रंगीत चित्रे ३००+ पक्ष्यांची विस्ताराने माहिती आणि प्रत्येक पक्ष्याचे विविध भारतीय भाषांतील स्थानिक नाव अश्या अनेकविध वैशिष्ट्यांनी नटलेली ही हार्डकव्हर आवृत्ती प्रत्येकाने जवळ ठेवावीच
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
मस्त खरेदी
अरे ऋ, या पुस्तकाचा मराठी अनुवाद पण आहे ना रे?
भारतीय पक्षी
भारतीय पक्षी हा त्यामानाने बराच संक्षिप्त अनुवाद आहे. आणि ते पुस्तक आता आउट ऑफ प्रिंट आहे
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अरेच्चा, हा धागा नजरेतून कसा
अरेच्चा, हा धागा नजरेतून कसा सुटला होता काय माहित.
परिचय सुरेखच.
इंग्रजी पुस्तक तर नक्कीच घेईन. शिवाय अनुवादही कुठे मिळाला तर घेउन ठेवेनच.
एनबीटी च्या संकेतस्थळावर माहिती आहे
वल्ली मित्रा,
या दुव्यावरुन तुला मराठी भाषेत एनबीटी ने प्रकाशित केलेली पुस्तकांची यादी उतरवून घेता येईल.
या यादीत मला भारतीय पक्षी हे पुस्तक दिसते आहे
, तेव्हा नॅशनल बुक ट्र्स्ट इंडियाच्या कुठल्याही सेंटरवर हे पुस्तक मिळावे. तुला त्याची नेमकी माहिती हवी असेल तर 'यशोधरा' ला गाठ. ती एनबीटी ची नियमित खरेदीदार आहे
तुला मिळाले तर माझ्यासाठी पण एक कॉपी घेऊन ठेव.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
धन्यवाद मित्रा. दुवा रोचक
धन्यवाद मित्रा.
दुवा रोचक आहे. पीडीएफ संगणकावर उतरवून घेतली आहे.
नोंद करुन ठेवली आहे
सहसा मी अशी पुस्तके स्वतः हाताळून मगच घेतो त्यामुळे या पुस्तकाची नोंद करुन ठेवली आहे.
इकडे बंगळूरात सहज मिळाले तर बघेनच नाहीतर पुढच्या पुण्यनगरीच्या भेटीत हे पुस्तक निशाण्यावर नक्कीच असणार आहे
एका सुंदर पुस्तकाची माहिती शेअर केल्याबद्दल धन्यु रे ऋ
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
कालबाह्य
या पुस्तकांतील बरेच संदर्भ नव्या संशोधनानुसार कालबाह्य ठरले आहेत. ( हे जाहीर केले गेले आहे.) आता पक्ष्यांचे जे विभाजन आहे, तेही पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे ही जुनी पुस्तकं आता केवळ "तुलनात्मक अभ्यासा"साठी उपयुक्त राहतील. मुळातून व गांभीर्याने अभ्यास करायचा असेल, तर घेणे टाळावे.
धागा वर आणतो आहे
कोणा हॅकर्सच्या प्रतापामुळे पुन्हा साईट वर असे धागे वर आणावे लागत आहेत...
व्यवस्थापकांनी यात लक्ष घालावे ही विनंती
मी एवढ्यात काही पुस्तके घेतली आहेत
मराठी:
१. एक शून्य मी - पु.ल. देशपांडे
२. जोयानाचे रंग - कविता महाजन
३. धुळीचा आवाज - कविता महाजन
४. टू द लास्ट बुलेट - विनिता कामठे
५. सलाम व्हिएतनाम - जे एस आपटे
६. आश्रम हरिणी - वा. म. जोशी (१९१६ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला डॉ. लीला गोविलकर यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. )
७. डॉ. होमी भाभा - जयंत एरंडे
इंग्रजी:
१. राजतरंगिणी - कल्हण - साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला जवळपास ७८३ पानांचा ठोकळा अवघ्या २०० रुपयाचा आहे. (संदर्भ ग्रंथ म्हणून घेतला आहे) १८६ ला फ्लिपकार्टवरुन मिळाला.. फ्री शिपिंग सकट
२. द टिपिंग पॉईंट - मॅल्कोम ग्लॅड्वेल (एका मित्राच्या सल्ल्यावरुन घेतले आहे. तो शिव खेरा टाईप पुस्तकांचा प्रचंड तिरस्कार करतो तरीही हे पुस्तक त्याला आवडले म्हणजे इसमे कुछ बात तो होगी)
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
Steve Jobs
चक्क Steve Jobs चे Walter Isaacson ने लिहिलेले चरीत्र (The Exclusive Biography) भेट म्हणून मिळाले आहे
तेही हार्डकव्हर
हातातले पुस्तक संपताच हे वाचायला घेणार आहे
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
नशीबवान आहेस ऋ
आम्हाला अशा भेटी कधी मिळणार?
नाही म्हणायला मलाही काही पुस्तके भेट म्हणून मिळतात. स्टीव्ह जॉब्सचे चरित्र वाचायला नक्की आवडेल पण एवढ्यात तरी नाही वाचणार
२०१२ मध्येच वाचेन.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
;)
काही परिचितांनी पुस्तके सोडून दुसरे काहि (जसे शर्ट, काहितरी घरगुती सामान-फ्रेम-फ्लॉवरपॉट, वॉलेट वगैरे वगैरे) दिल्यावर फारसा आनंद दाखवला नाहिस किंवा/आणि पुस्तके देणार्याची इतरांसमोर (जरा जास्तच) स्तुती केलीस की पुढच्या प्रसंगी सगळ्यआंकडून पुस्तकेच भेट म्हणून मिळतील याची खात्री बाळग
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
भन्नाट कल्पना
एक्दम भन्नाट कल्पना आहे ऋ...
माझे (२ व्यक्ती सोडल्या तर) माझे परिचित मला पुस्तके कधी भेट देत नाहीत.

आता असेच करतो , म्हणजे माझ्याकडचा पुस्तकांचा ढीग वाढत जाईल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नवीन संग्रह
बुकगंगावरुन
१. आणि चिनार लाल झाला - प्रभाकर पेंढारकर ( इथेच बहुतेक चर्चा झाली होती. नेमका धागा सापडत नाही त्यामुळे दुवा देत नाहिये. त्यामुळेच ही कादंबरी घेतली आहे)
२. विवेकसिंधु ( आध्यकवि मुकुंद विरचित मराठीतील पहिल्या काव्याचा दावा असणारे पुस्तक )
३. यमुनापर्यटन - बाबा पदमनजी (मराठी साहित्यातील पहिली कादंबरी)
४. श्रीमद् भगवद गीतारहस्य - लोकमान्य टिळक ( प्रसिद्ध लेखक श्री संजय सोनवणी यांनी आग्रहाने गीतेवरचे हे सुंदर पुस्तक वाचायला सांगितल्यामुळे घेतले आहे. गीतेवर उस्फूर्त आणि उच्च कोटीची विद्वत्ता प्रकट होईल अशा दर्जाचे गीतेवरचे लेखन क्वचितच वाचायला मिळते असे त्यांनी सांगितले होते म्हणून घेतले आहे.)
५. साहित्याची भाषा - भालचंद्र नेमाडे
६. नेनचिम - नारायण धारप (मिळाले एकदाचे)
फ्लिपकार्टवरुन
७. गारंबीची राधा - श्री.ना.पेंडसे
८. एक झुंज वार्याशी - पु. ल. देशपांडे
९. तुका म्हणे आता - पु. ल. देशपांडे
१०. वनवास - प्रकाश नारायण संत
११. पैस - दुर्गा भागवत
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
दमदार खरेदी रे मित्रा. सतत
दमदार खरेदी रे मित्रा.
सतत उत्तमोत्तम पुस्तकांची तुझी खरेदी चालूच आहे.
शापित यक्ष
शापित यक्ष - बाळ सावंत नुकतेच बुकगंगावरून उचलले
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
वाचले की नक्की सांग
ऋ,
अरेबियन नाईट्स फेम रिचर्ड बर्टनचे हे चरित्र वाचून झाले की कसे वाटले ते नक्की सांग.
बरेच गाजलेले पुस्तक आहे हे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
फ्लिपकार्टवरून कालच
फ्लिपकार्टवरून कालच अंतर्बाह्य -रत्नाकर मतकरी (गूढकथांचा ताजा संग्रह) आणि बनगरवाडी- व्यंकटेश माडगुळकर ही दोन पुस्तके ऑर्डरवली आहेत.
मस्त रे मित्रा
मतकरी म्हणजे तुझा विकपॉईंट हे माहिती आहे. फ्लिपकार्ट वाल्यांनी मतकरींची कित्येक पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत त्यामुळे तुझी चंगळच आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हो रे. अर्थात मतकरींच्या
हो रे.
अर्थात मतकरींच्या जवळजवळ सर्वच गूढकथा माझ्याकडे आहेत. फ्लिपकार्टवर खरेदी सुरु करायच्या बर्याच आधीपासूनच आहेत. हे नविन दिसले तिथे म्हणून लगेच उचलले.
मस्तच
माझ्याकडे मतकरींची खूप कमी पुस्तके आहेत.
पण मी देखील पुढच्या वर्षी पुस्तके ठेवायची जागा झाली की त्यांची पुस्तके एकदम उचलणार आहे.
तसेच नारायण धारपही निशाण्यावर आहेच
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
आज शनिवार पेठेत दिलीपराज
आज शनिवार पेठेत दिलीपराज प्रकाशन येथे गेलो, तिथे सुशिंची ३ पुस्तके २५% सवलतीत मिळाली
१. हमखास
२. संदेह (सुशिंच्या गूढकथांचा संग्रह)
३. बरसात चांदण्यांची (नुकतीच प्रकाशित झालेली नवी आवृत्ती)
सागर मित्रा, बरसात.. चं मोल माझ्यासाठी किती आहे ते तुला चांगलच माहित आहे.
अरे वा मस्तच
शेवटी एकदाचे बरसात चांदण्यांची मिळाले तुला

माझी खात्री आहे की हातातले दुसरे पुस्तक खाली ठेवून तू गंधाली आणि चंद्रवदनच्या प्रेमकहाणीत रमून गेला असशील
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
काश असं झालं असतं. पण हातातलं
काश असं झालं असतं.
पण हातातलं पुस्तक आधी मी पूर्ण करेन झटपट, आज -उद्याच. मगच बरसातीत रंगून जाईन.
अरे तो
अरे तो धम्या सुशींची पुस्तकं कुठनं तरी ५०% सवलतीत उचलतो .. त्याला विचारायला हवे होते रे !
ग्राहक पेठ-टिळक रोड जवळच्या
ग्राहक पेठ-टिळक रोड जवळच्या भारत बुक सर्विस मधून ती पुस्तके मिळतात ५०%ने. पण दिलीपराज प्रकाशनाची पुस्तके ते ठेवत नाहीत.
धम्याने सांगितल्यामुळे मी पण तिथून एकदा सुशिंची पुस्तके उचलली होती.
लज्जागौरी
रा. चिं. ढेरेंचं लज्जागौरी घेतलंय.
सुंदर निवड
ज्योति,
लज्जागौरी मी वाचले आहे.
ज्या पद्धतीने ढेरे सरांनी विश्लेषण आणि संशोधन केले आहे त्याला तोड नाही.
या पुस्तकात त्यांनी रेणुका माता, खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा, विठोबा अशा अनेक लोकदेवतांचा परामर्श घेतला आहे
असे असले तरी मुख्यत्वेकरुन देवींच्या संशोधनावर जास्त भर आहे या पुस्तकात.
रेणुकामाता, त्याअनुषंगाने परशुरामकथा,मग माहूरची देवी, चर्पटांबा, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजाभवानी या सर्वांबरोबर इतरही अनेक देवींवर या पुस्तकातून वाचायला मिळते.
सुंदर पुस्तक वाचायला निवडले आहे ज्योति तुम्ही.
ज्यांना संशोधनग्रंथ वाचायची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ईच्छा
पुस्तके घ्यायची खुप ईच्छा आहे, पण बुकगंगाहुन जरी मागवली तरी इथे डिलिव्हरीचा खर्च फारच घेतात
सध्या दिवाळीत मित्राहाती मागवलेला एकमेव दिवाळी अंक अक्षर दुसर्यांदा वाचतोय.
स्वागतम्
पुन्हा आनंदयात्री सक्रिय झालेला पाहून आनंद झाला
बुकगंगा फक्त भारतातच फ्री शिपिंग देते
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/