'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत?
एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत?
या धाग्याचा हेतू सध्या बाजारात कोणत्या पुस्तकांना जास्त मागणी आहे हे ओळखून जास्त मागणी असलेल्या पुस्तकांची ओळख वाचकांना व्हावी हा आहे.
मी अलिकडेच घेतलेली पुस्तके
जी.ए.कुलकर्णी
- काजळमाया
- रमलखुणा
- पिंगळावेळ
- सांजशकुन
गो.ना.दातार
- अधःपात
- इंद्रभुवनगुहा
गो.नी.दांडेकर
- कोण्या एकाची भ्रमणगाथा
- स्मरणगाथा
- महाराष्ट्रदर्शन
- रानभुली
- जैत रे जैत
- शितू
सुहास शिरवळकर
- गुणगुण
- अनुभव
- ऑर्डर ऑर्डर
- सायलेन्स प्लीज
- सूत्रबद्ध
- ट्रेलर गर्ल
- फलश्रुती
- थरारक
- ब्लॅक कोब्रा
भालचंद्र नेमाडे
- कोसला
विजय देवधर
- डेझर्टर
अच्युत गोडबोले
- किमयागार
जगन्नाथ कुंटे
- साधनामस्त
- कालिंदी
- नित्य निरंजन
वि.स.खांडेकर
- ययाति
मूळ लेखकः पुपुल जयकर - अनुवाद: अशोक जैन
- इंदिरा गांधी
प्रदीप दळवी
- रक्तरेखा
मालती दांडेकर
- चक्रवर्ति (अशोक)
अविनाश बिनिवाले
- पूर्वांचल
मूळ लेखकः डॅन ब्राऊन - अनुवाद: अशोक पाध्ये
- डिसेप्शन पॉईंट
बाळशास्त्री हरदास
- आर्य चाणक्य (भाग १)
रविंद्र गुर्जर
- पॅपिलॉन
किरण नगरकर
- सात सक्कं त्रेचाळीस
- प्रतिस्पर्धी ('ककल्ड' या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद)
ना.सं.इनामदार
- राऊ
द.ग.गोडसे
- मस्तानी
व.पु.काळे
- पार्टनर
भालबा केळकर
- शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६) बाल-वांड्ग्मय
मूळ लेखिका: डेबोरा एलिस अनुवादः अपर्णा वेलणकर
- ब्रेडविनर
- परवाना
मूळ लेखक: एस. एल्. भैरप्पा अनुवादः उमा कुलकर्णी
- पर्व
तुमची यादी देताय ना? 





एकही
अलीकडच्या काळात एकही मराठी पुस्तक विकत घेतले नाही. अलीकडची खरेदी म्हणायची झाली तर त्यालाही सहा महिने होऊन गेले. ती इंग्रजीच पुस्तके आहेत. महिन्यापूर्वी घेतले तेही इंग्रजीच - द रिव्हेंज ऑफ गया!
अलीकडे हाती आलेलं एकमेव मराठी पुस्तक म्हणजे नेमाड्यांची हिंदू ही कादंबरी. पण ती भेट स्वरूपात आली.
अलिकडे मराठीतील साधना आमटे
अलिकडे मराठीतील साधना आमटे यांचे समिधा विकत घेतले. शिवाय मीना प्रभु यांची मेक्सिकोपर्व व दक्षिणरंग विकत घेतली. बाकी मी वाचनालयप्रिय असल्याने पुस्तक खूप आवडल्याशिवाय विकत घेत नाही.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
गेल्या १० दिवसांत घेतलेली...
मीना: अफगाण मुक्तीचा आक्रोश, कुण्या एकाची भ्रमणगाथा, हिंदू, बनगरवाडी, दक्षिणरंग, स्मरणगाथा, कादंबरीमय शिवकाल, मंडालेचा राजबंदी, स्वतःविषयी, अवकाश, फाळणी ते फाळणी, तुंबाडचे खोत - भाग १ व २, पाण्याचे पंख, दुर्गभ्रमणगाथा, मेक्सिकोपर्व, पडघवली, पवनाकांठचा धोंडी, जैत रे जैत, डोह, स्थलांतर, एका तेलियाने, कोसला, कळ, झूल, जरीला, सुखी माणसाचा सदरा, साधा माणूस, माचीवरला बुधा, पारधी, प्रकाशवाट, ब्र, डेनिसच्या गोष्टी - भाग १ व २, तोत्तोचान, शितू, कागदी बाण, हाउज दॅट!, मिरासदारी, पॅपिलॉन, तंट्या, प्राणघातक कंठा, मालगुडी डेज, मेमरीज ऑफ मिडनाईट, झेप, झुंज, सोन्याचा पिंपळ, हसगत, प्रिय जी.ए., नवी गुगली, कोल्हाट्याचं पोर, ओंजळधारा, बलुतं, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, हापूस पायरी, छावा, नथींग लास्ट्स फॉरेव्हर, भिन्न, तुका आकाशाएवढा, कहाणी लंडनच्या आजीबाईंची, साद देती हिमशिखरे, उत्खनन, कोरडी भिक्षा, मुलगा माझाच, नर्मदे हर हर, साधनामस्त, कालिंदी, पावणेदोन पायांचा माणूस, कृष्णकिनारा, डेझर्टर, रक्तरेखा, नित्यनिरंजन, ही 'श्रीं'ची इच्छा!
तु तर भरपूर खरेदी केलीस
जवळजवळ ८/१० हजारांची खरेदी केलीस. इतकी पुस्तके कुठून घेतलीस ते पण सांग, बहुतेक ज्ञानगंगा प्रदर्शनातूनच असावीत. शिवाय एवढी घेतलीस म्हणजे सवलत पण घसघशीत मिळाली असेलच.
आयडीयल मुंबई आणि शुभम
आयडीयल मुंबई आणि शुभम साहित्यचे औबादला प्रदर्शन लागलेय तिथून घेतलीत ही सर्व पुस्तकं. दिगुकाकांच्या मदतीने आणि प्रदर्शनांच्या साह्याने सवलतही उत्तम मिळाली मला. हे ज्ञानगंगा प्रदर्शन कुठे लागलेय? मला कल्पना नाही त्याची. माहिती सांगशील का जरा? सद्ध्यातर अत्रेमध्येही पुस्तकांचे प्रदर्शन लागलेय म्हणे.. एका पुस्तक खरेदीवर एक पुस्तक फ्री असे काही सांगत होता हापिसातला एक जण. बघावे लागेल उद्या-परवा काय प्रकार आहे ते.
बाबांची तब्येत आताशा त्यांना साथ द्यायला ठाम नकार द्यायला लागल्याने रिटायर व्हावेच लागेल याची त्यांना चांगलीच कल्पना आली आहे पण घरी राहून (बसून म्हणता येणार नाही कारण त्यांना सलग १-२ तास बसवतच नाही आजकाल) काय करायचे असा त्यांना अगदी गहन प्रश्न पडल्याने त्यांची खूपच मानसिक कुतरओढ चाललेली दिसत होती. मनानेही खचतायत का काय असे वाटायला लागले होते. पुस्तकांची संगत त्यांना आवडेल असे वाटले म्हणून घेतलीत शिवाय आईला आणि मलाही आवड आहेच. कॉलेजात असताना लायब्ररीची सर्वात जास्त पुस्तके वाचणारा विद्यार्थी म्हणून बक्षिस मिळवलेले बाबा.. आज कौतुकाने जीएंचे ओंजळधारा वाचले, पुलंचे अमुकतमुक पुस्तक वाचले, गोनिदांची पुस्तके फार पुर्वी वाचली होती, आज परत ही पुस्तकं हातात धरताना डोळे पाणावले आठवणींनी वगैरे सांगायला लागलेत! तू म्हणाला तसे झालेही असतील पैसे खर्च पण त्याबदल्यात जे हे त्यांचे समाधान आणि आनंदाने भरलेले चेहरे मला दिसतायत ते निखालसपणे अमूल्य आहे! शेवटी काय - जीवाभावाची माणसंच जपायला हवीत, बाकी सारं झूठ आहे.. नाही का?
अत्रे मध्येच ज्ञानगंगा
अत्रे मध्येच ज्ञानगंगा लागलेय. आणि 'एक विकत -एक मोफत' अक्षरधाराची योजना आहे.
बापरे!!! सगळा पगार उडवलेला
बापरे!!!
सगळा पगार उडवलेला दिसतोय
आणि ठेवतेस कुठे आणि कशी इतकी पुस्तकं?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
आमची लिब्रा
>ठेवतेस कुठे आणि कशी इतकी पुस्तकं?
औरंगाबादच्या लिब्रात! आधी आमची पुस्तकं कधी ट्रंकेत तर कधी कपाटात कोंबावी लागायची कशीबशी... आता मात्र पुस्तकांना नवीन घरी त्यांची स्वतःची स्वतंत्र ऐसपैस खोली मिळाली आहे! नव्या घरातले फर्निचर केले तेव्हा मी अगदी स्वतः जातीने लक्ष घालून पुस्तकांसाठी लाकडाचे नऊ रॅक्स करून घेतलेत काचेचे सरकदरवाजे असलेले आणि एक टेबल खुर्चीपण. परवा पुस्तकांची काळजी कशी घ्यावी? या धाग्यात मकीने सुचवल्यानुसार प्लॅस्टीकचे रोल्स आणून सर्व पुस्तकांना कव्हर्स घालायचे काम आईने करायला घेतले आहे. अर्धीअधिक पुस्तकं तर एव्हाना त्यांचे हे नवे अंगरखे ल्यालीही आहेत! मी मदत करते म्हटलं बाकीच्या पुस्तकांना अंगरखे घालण्यात तर आईने निक्षून सांगितले आहे की ते काम तीच करणार आहे आणि मी मध्येमध्ये लुडबुड करू नये! तिने ती जबाबदारी संभाळलीये म्हणता मी यादी करायचे काम घेतले (खरेदीचेही घेतलेच आहे मी माझ्याचकडे!). यादीच्या कामात एक्सेलमध्ये लिहायला घेतले तर बरहा वापरून मराठी लिहिता येत होते पण सेव्ह करून परत ओपन केले की करप्टेड दिसत होते.. मग निखिलला विचारल्यावर त्याने मदतीदाखल एक सूचना केली आणि प्रश्न फटकन सॉल्व्ह झाला! मगजमारी करकरत हव्या त्या तपशीलांनिशी यादीही तयार झालीये आता. मोठ्यांचे, लहानांचे, अध्यात्मिक आणि कलाविषयक असे मुख्य चार विभाग केले आहेत.. त्यात पहिले मूळ लेखक, दुसरे अनुवादक आणि तिसरे पुस्तकाचे नाव अशा तीन टप्प्यांच्या अल्फाबेटीकल सॉर्टींग्सने लावलेल्या याद्यांची प्रिंटेड कॉपी आईला देऊन आले परवा. तिचे कव्हर्स लावून झाले की ती यादीतल्या क्रमाने लावणारे सगळी पुस्तकं. पुण्या-मुंबईतली खरेदी माझे वाचन जसजसे होईल तसतशी औबादला जात असते मात्र पुण्याचा स्टॉक खतम होत नाही तोवर औबादची खरेदी पुण्याला न्यायची नाही अशी आईची खास तंबी आहे.. माझ्या खरेदीवर अंकुश ठेवण्याचा हा आईचा तोडगा आहे बहुतेक! पुण्याला काही खास जागेची सोय नाही पण त्यातल्या त्यात एक खास कप्पा पुस्तकांनाच असावा असे मी पाहिलेले आहे. परवा यादी करताना तब्बल ७-८ पुस्तकं गायबलेली कळली त्यामुंळे आता आई लिब्राला कूलूपच ठोकणार असे म्हणतेय! पुस्तकांची सुवाच्य मराठी अक्षरातली छापील यादी मिळाल्याने आई भारी खुश आहे आणि कव्हर घातलेय असे सांगितल्याशिवाय खरे पटणार नाही असे सुंदर अंगरखे ल्यालेली पुस्तके पाहून माझाही जीव हरखून गेलाय अगदी. आता किमान ८-१० महिने तरी पुस्तकखरेदी करायची नाही असे मी पक्के ठरवलेले आहे... अर्थातच हा नियम मोडायला तितकेच खास पुस्तक मला आढळत नाही तोपर्यंतच!
अरे वा .. छानच की! घरात
अरे वा .. छानच की! घरात सगळ्यांनाच वाचनाची आवड असण्याचा परिणाम
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
फोटो??
या तुझ्या मस्त लायब्ररीचा फोटो(एक? छे.. इतकी पुस्तके आणि नऊ रॅक्स एका फोटोत येणं केवळ अशक्य आहे) टाक ना इथे. मला आवडेल पाहायला!!!
सध्या फक्त नेमाड्यांची हिंदु
सध्या फक्त नेमाड्यांची हिंदु घेण्यात आलेली आहे.
पुढच्या महिन्यात पुस्तक खरेदीचा मुहुर्त लागेल असे वाटते.
निखिल देशपांडे
गेल्या २/३ महिन्यांत घेतलेली
१. हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे
२. संभाजी- विश्वास पाटील
३. शाळा- मिलिंद बोकील
४. ईफ टुमारो कम्स - सिडने शेल्डन - अनु. विजय देवधर
५. वन शॉट - ली चाइल्ड - अनु. बाळ भागवत
हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ -
हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे
कसे आहे हे पुस्तक? की तुम्हीही विकताय अर्ध्या किमतीत?
+१ असेच म्हणतो
यशोधरा तुम्ही घेतले की मला पण सांगा. तुमचे वाचून झाले की तुम्ही मला द्या तुम्ही घेतलेल्याच्या निम्या किमतीत
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अलीकडेच घेतलेली
काजळमाया - जी.ए. कुलकर्णी
पर्व - एस एल भैरप्पा (अनुवादः उमा कुलकर्णी)
आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
फॉर हिअर ऑर टु गो - अपर्णा वेलणकर
- बटुकेश्वर
अलिकडे घेतलेली
जेव्हा माणुस जागा होतो - गोदाताई परुळेकर
डायरी ऑफ अॅन फ्रँक - मंगला निगुडकर
माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
थोडी माहिती द्यावी ही विनंती
विवेक,
जेव्हा माणुस जागा होतो - गोदाताई परुळेकर
या पुस्तकाबद्दल काही ऐकले नाही. जमले तर परिक्षण लिहा ना यावर. किंवा इथेच थोडी या पुस्तकाविषयी माहिती दिलीत तरी चालेल. जसे जमेल तसे करा ही विनंती.
बाकीची २ पुस्तके माहिती आहेत.
धन्यवाद
-सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
जेव्हा माणुस जागा होतो
मी पण आताच हे पुस्तक वाचायला घेतलं आहे, ५०-६० वर्षांपुर्वी ठाणे जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी पाड्यात रहाणारे आदिवासी, तिथले जमीनदार, गोदाताई, कॉ. परुळेकर आणि लाल बावट्याचा त्या जमिनदार आणि प्रस्थापित यंत्रणेविरुद्ध संघर्ष यावरचे गोदाताईंचे अनुभव आहेत. पुर्ण वाचल्यावर सविस्तर लिहीनच.
नक्की लिहा
विवेक,
मला हा विषय अंधुकपणे आठवतो आहे.
वाचून झाले की नक्की लिहा या पुस्तकावर. वाट बघतो आहे.
मग मी ही वाचीन हे पुस्तक
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नवीन खरेदी
या आठवड्यांत पुढील पुस्तके घेतली आहेत.
कालिकामूर्ति - गो.ना.दातार
छावा - शिवाजी सावंत
झुंज - ना.सं.इनामदार
झेप - ना.सं.इनामदार
राशिचक्र - शरद उपाध्ये
पडघवली - गोनीदां
दुर्गभ्रमणगाथा - गोनीदां
शाळा - मिलिंद बोकील
आंधळी - शांता शेळके
सर्पगंध - अरुण ताम्हणकर
भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका - पु.ना.ओक
सत्तांतर (भाग १ नाही मिळाला २ व ३ मिळाले) - गोविंद तळवलकर
अग्निकांड - गोविंद तळवलकर
इफ टुमारो कम्स - सिडने शेल्डन - विजय देवधर
डायरी ऑफ अॅन फ्रँक - मंगला निगुडकर
समिधा - साधना आमटे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
आज काही दुर्मिळ पुस्तके घेतली
४/५ वर्षांपासून माझा चालू असलेला शोध आज अखेर संपला. लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी, तांबडफुटी ही गोनिदांची तसेच श्री. ना. पेंडश्यांची कलंदर ही दुर्मिळ, आउट ऑफ प्रिंट पुस्तके मला बर्याच शोधानंतर पुण्याच्या मॅजेस्टिक बुक स्टॉल इथे मिळाली अर्थात पुस्तकांचे मुखपृष्ठ गायब आहे. तरीही पुस्तके चांगल्या स्थितीत असून नवीनच आहेत.
त्याचबरोबर श्रीराम बुक एजन्सी, पुणे इथून सिडने शेल्डन यांची अनुवादीत 'टेल मी युअर ड्रीम्स्', 'द बेस्ट लेड प्लान्स', 'नथिंग लास्ट फोरेव्हर' ही तीन पुस्तके २५% सवलतीसह आणली.
आम्ही तर अजून बालपणातच रमतो
आम्ही तर अजून बालपणातच रमतो आहोत
आजच ज्युलियन व्हर्न यांच्या श्टोर्यांचा भागवतांनी केलेल्या अनुवादाचे ३ संच घेतले
भागवतांचे अनुवाद शाळेत असताना
भागवतांचे अनुवाद शाळेत असताना खुप आवडायचे...
अवांतर: अजुनही लोकसत्तामध्ये बोक्याची मालिका येते.. न चुकता सोमवारी वाचतो..
सार्थ ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी वाचायचे कधीपासून मनात होते. पण योग्य माहिती मिळत नव्हती. कदाचित ज्ञानेश्वरी वाचायचा पण योग यावा लागतो असे दिसते. अचानकच मला योग्य माहिती मिळाली आणि पुढील ज्ञानेश्वरीची प्रत घेतली आहे.
(अजून हातात यायची आहे. १-२ दिवसांत मिळेल)
"सार्थ ज्ञानेश्वरी"
आळंदीचे साखरे महाराज यांनी निरुपणासहीत विशद केलेली.
पृष्ठसंख्या ११०० पेक्षा जास्त
किंमत २९०
मामा (सोनोपंत) दांडेकर यांनी संपादीत केलेली ज्ञानेश्वरीची प्रत देखील प्रसिद्ध आहे.याव्यतिरिक्त प्रसाद प्रकाशनची य.गो.जोशी यांचीही सार्थ ज्ञानेश्वरी प्रसिद्ध आहे.
ज्ञानेश्वरी श्रेष्ठच आहे यात वाद नाही. मी घेतलेली प्रत ही समजायला अधिक सोपी आहे म्हणून घेतली आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
या विकांताला
या विकांताला
वनवास : प्रकाश नारायण संत
स्मृतीचित्रे: लक्ष्मीबाई टिळक
एका तेलियाने: गिरिष कुबेर
ही पुस्तके विकत घेतली.
यातील नंतरची दोन आधी लायब्ररीतून आणून वाचली आहेत. वनवास माझ्या मामाकडे होते त्याची पारायण केली होती. (थोडं २६ जुलैच्या पावसात व नंतर सतत वाचल्याने) आता ते पुस्तक खराब झालं.
म्हणून ते विकत घेतलं
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
वनवासाच्या रांगेतली बाकीची?
वनवास घेतलेस तर मग त्याच रांगेतली संतांची बाकीची पुस्तकंही आहेत ना तुझ्याकडे? नसतील तर तीही संग्राह्य आहेत अगदी.. पंखा, झुंबर आणि शारदा संगीत.
बाकीची पुस्तके आहेत
(अर्थातच) आहेत
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
आठवले तसे -
आठवले तसे - दुर्गाबाई
जगण्यातील काही - अवचट.
ह्या महिन्याची खरेदी.
कालच
घेतली!
१. चंद्रिके गं, सारिके गं,
२. एक एक पान गळावया. -- दोन्ही गौरी देशपांडे.
३. युद्ध जीवांचे. -- गिरिश कुबेर.
४. सोन्याच्या धुराचे ठसके. -- डॉ. उज्जवला द्ळवी.
कालच
घेतली!
१. चंद्रिके गं, सारिके गं,
२. एक एक पान गळावया. दोन्ही गौरी देशपांडे.
३. मैत्र जिवांचे. -- गिरिश कुबेर.
४. सोन्याच्या धुराचे ठसके. - डॉ. उज्जवला द्ळवी.
काल घेतलेली - १. विंचुर्णीचे
काल घेतलेली -
१. विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे
२. रवींद्रायन - रवींद्र पिंगे ह्यांच्या ललितांचा संग्रह
३. मृत्यूचे महात्म्य - श्री.ठक्कर (की विमलाबाई ठक्कर - पाहून सांगते परत)
४. दुर्गदर्शन - गोनीदा
आणि ५. तत्वमसि - ध्रुव भट - अनुवादित - अंजनी नरवणे
रोचीन, तू घेतलली गौरीची पुस्तकं आहेत गं माझ्याकडे.
दोन्ही मला फार आवडतात. चंद्रिके तर भलतच मस्त आहे!
आता
माझ्याकडे गौरीची 'आहे हे असं आहे' व अरेबीअन नाईट्स सोडून सर्व पुस्तके आहेत. ती माझ्या आवडत्या लेखिकेपैकी आहे. तु उत्खनन वाचलं आहे का??आणि दुस्तर हा घाट, मुक्काम?
हि ३ सर्वात आवडीची!!!
आहे हे असं आहे वाचलय. आहे
आहे हे असं आहे वाचलय. आहे माझ्याकडे.
उत्खनन, दुस्तर हा घाट आणि मुक्काम लिस्ट्वर ठेवते.
परवा जावून
२ दिवसांपुर्वीच पुण्यातील शशिदीप प्रकाशन येथे गेलो. तिथून सुहास शिरवळकरांची 'दुनियादारी' व ' सुत्रबद्ध' ही एकूण ५०० र. ची पुस्तके ३७५ र. ला घेतली. तसेच नंतर मेहता पब्लिशिंग हाउस येथून उदय भिडे अनुवादित टॉम मार्टीन यांची 'पिरॅमिड' ही रहस्यकादंबरी ५०% सवलतीत विकत घेतली.
ब्र
शनिवारी "ब्र" आणि "रुचिरा" ही दोन पुस्तके विकत घेतली.
"ब्र" हे मी न वाचता घेतलेले बहुदा पहिले पुस्तक असावे. मागे दिगम्भांनी इथे पुस्तकातील वेचा दिला होता तो वाचला व नंदनचे हे परिक्षणही वाचले. लायब्ररीत खूप बुकिंग आहे ह्या पुस्तकाला! तेव्हा विकतच घेतलं.
एका बैठकीत संपवलं आहे.. जरा वेळ लागेल पचायला. अश्या परिस्थितीमुळे (खरंतर उगीच) असाहय वाटणं कमी झालं आणि नंदन पेक्षा वेगळं काहि लिहावसं वाटलं की/तर लिहिनच "ब्र" बद्द्ल
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
१. भोवरा - इरावती कर्वे २.
१. भोवरा - इरावती कर्वे
२. बेस्ट ऑफ जयवंत दळवी - संपादित, सुभाष भेंडे - पुस्तकाआरंभी दळवींवर भेंडे ह्यांनी खूप सुरेख ललितपर असं लिहिलेलं आहे, मला तरी आवडलं
३. लवासा - निळू दामले. वाचतेय आणि अनेक प्रश्न मनात उभे राहिलेत. लवासाशी संबधित कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाही! ना लवासावाल्यांवर, ना पाटकरांवर, ना गावकर्यांवर आणि दामल्यांवरही!
४. तलावातील चांदणं - गंगाधर गाडगीळ
५. खमंग - दुर्गाबाई भागवतांनी सांगितलेल्या, एकत्र संकलीत केलेल्या पाककृती.
६. क्रौंचवध - खांडेकर.
लवासा
यावर विस्ताराने लिही ना.. पुस्तक परिचयातून आलं तरी चालेल.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
असेच म्हणतो
वाचायला आवडेल यावर
लवासा हे सध्या पुण्याच्या जवळ चालू असलेला लवासा सिटी च्या हाऊसिंग प्रोजेक्ट बद्दल आहे की दुसरे काही आहे?
http://www.lavasa.com/ या संकेत स्थळावर ह्या प्रोजेक्ट बद्दल कळाले...
शरद पवारांचा हा प्रोजेक्ट आहे असे कळते. त्यांचे नाव दिसले नाही, त्यामुळे ही शंका.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ऋ, सागर मी वाचत आहे अजूनही,
ऋ, सागर मी वाचत आहे अजूनही, पण एक गोष्ट नकी वाटायला लागली आहे की प्रत्येकाचे लागेबांधे असतात आणि त्यनुसार सगळी सत्यं वळवली जातात! आणि हे संबंधित सर्वांनाच कमीअधिक प्रमाणात लागू पडत असणारच...
असेच म्हणतो
लागेबांधे असल्याशिवाय काही मोठ्या गोष्टी होत नाहीत.
यशोधरा हे पुस्तक वाचून झाल्यावर नक्की सांग. पुस्तकाचे परिक्षण लिहू शकलीस तर उत्तमच नाहीच जमले तर ढोबळ कल्पना देऊन ठेव. कारण हे पुस्तक माझ्या रडार वर आहे. दिवाळीच्या खरेदीच्या यादीत टाकलेले आहे. पण तुझा फीडबॅक पाहूनच ठरवेन.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सागर, अजूनतरी एकांगी वाटते.
सागर, अजूनतरी एकांगी वाटते. म्हणजे, दामल्यांकडून निराशा. कदाचित ते म्हणतात ते बरोबरही असेल. मी स्वतःला मेधा पाटकर सतत १००% बरोबर असतात असे कधीच वाटलेले नाही, तरीही दामल्यांना अप्रत्यक्ष पीआरच्या कामाला जुंपले आहे की काय असे वाटते पुस्तक वाचताना, खरे तर. म्हणजे अजूनतरी माझी अशीच समजूत होत चालली आहे आणि त्याचेच मला वाईट वाटते.समतोलपणाचा आव आणून लिखाण केलेल आहे अशी समजूत करुन दिली आहे पण, मला तरी तसे वाटले नाही. पवारांचे नाव न घेता, त्यांची व त्यांच्याची, प्रकल्पाची subtle भलावण केली आहे असे खूपदा निदर्शनास येते. अर्थात, माझे अजून पूर्ण वाचून झालेले नाहीये. आत्तापर्यंत जे वाचले आहे, त्यावरुन तरी हे मत; पण, प्रकल्पाची दामल्यांनी मांडलेली बाजूही असतेच. तेह्वा, ती मांडण्यातही चूक नाही, असेही वाटते. एकूण काय, माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा तुकड्या तुकड्याने परस्परविरोधी माहिती मिळाल्याने भेजा फ्राय!
मग तर वाचलेच पाहिजे
भेजा फ्राय करणारे पुस्तक असेन तर मला तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे
अशी पुस्तके मला जाम आवडतात. नर्मदा फेम पाटकर बाईंबद्दल माझेही मत तुझ्यासारखेच आहे यशोधरा. पण प्रगतीसाठी धार्मिक आस्थेचा एवढा मोठा बळी देणे मलाही नाही पटत. पण त्यांचे आंदोलन बरेचसे पटते हे पण खरे आहे. काही गोष्टी नाही पटत पण तेवढे चालायचेच. शेवटी जगात कोणीच १०० % बरोबर असू शकत नाही.
तू म्हणतेस तसे या प्रकल्पाची ही एक बाजू माहिती झाली तरी थोडे फार हे लवासा प्रकरण माहिती करुन घ्यायला मदत होईल. मी दिलेली साईट पाहिलीस का? प्रकल्पाचे लोकेशन एकदम निसर्गरम्य वगैरे आहे असे दाखवताहेत. प्रत्यक्षात नदीला पूर आल्यावर किती घरे पाण्यात जातील याचे काही नियोजन वा अंदाज याबद्दल कोणी बोलत नाही. आपात्कालीन परिस्थितीत अंमलात आणायच्या योजनेचा पूर्णपणे अभाव असलेला असा हा लवासा प्रकल्प आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हापिसातून पाहता येत नाही
हापिसातून पाहता येत नाही साईट.
>>प्रगतीसाठी धार्मिक आस्थेचा एवढा मोठा बळी देणे मलाही नाही पटत. >> धार्मिक आस्था? धार्मिक आस्था म्हणण्याहीपेक्षा, एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जर जुनी मंदिरे जतन करता आली असती तर उत्तम झाले असते. अर्थात, माझी पोपटपंची. तसे करता येते का, त्याचा खर्च काय असतो वगैरे मला ठाऊक नाही.
धर्म ज्याच्या त्याच्या मनामध्ये जिवंत असतो, आणि प्रत्येकाची श्रद्धा, त्याचा पोत वेगळा. मंदिरे पाण्याखाली गेली म्हण्जे धार्मिक अनास्था दर्शवली गेली असे मला वाटत नाही. असो, विषयांतर नको
मोठा मुद्दा आहे नर्मदा
धरण प्रकल्पामुळे एक नुकसान कसे झाले ते सांगतो. मला वाटते जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदा हर मध्येच हे वाचले आहे. एके ठिकाणी चांगल्या प्रतिचे शाळीग्राम मिळायचे ते ठिकाण या धरण क्षेत्रात आल्यामुळे हे शाळीग्राम आता मिळणार नाहीत. नर्मदा परिक्रमा करणारे बहुतेक सगळे शाळीग्राम किंवा नर्मदेचे गोटे येथूनच घ्यायचे.
>>>> धर्म ज्याच्या त्याच्या मनामध्ये जिवंत असतो, आणि प्रत्येकाची श्रद्धा, त्याचा पोत वेगळा. मंदिरे पाण्याखाली गेली म्हण्जे धार्मिक अनास्था दर्शवली गेली असे मला वाटत नाही.
या तुझ्या मताशी मी पण सहमत आहे यशोधरा. मला धार्मिक आस्थेकडे बोट दाखवायचे होते ते नेमके ह्याबद्दलच होते. मंदिरे व प्राचीन बांधकामे यांना एक ऐतिहासिक ठेवा म्हणता येईल पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नर्मदा परिक्रमा करणार्यांचे हाल वाढले. अंतर जास्त आणि कुठे नक्की जायचे याचा गोंधळ. पण नुसते जुन्या मंदीरांबद्दलच नव्हे तर स्थानिक लोकांना फक्त स्थलांतरीत करुन मुद्दा सुटत नाही. ज्या रोजगारावर हे सर्व लोक जगत होते ती नैसर्गिक साधने त्यांच्यापासून हिरावली गेली. आता त्यांनी काय करायचे? हा मोठा मुद्दा आहे.
असो हा येथे चर्चा करण्याचा विषय नाही याबद्दल पूर्ण सहमत
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हो, ख व मध्ये बोलू.
हो, ख व मध्ये बोलू.
समतोलपणाचा आव आणून लिखाण
परखड मताबद्दल आभार. लायब्ररीतून सहज मिळाले तरच वाचेन
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
ऋ, पुस्तक संग्राह्य आहे. एक
ऋ, पुस्तक संग्राह्य आहे. एक रेफरन्स म्हणून नक्कीच चांगले आहे. केवळ विस्थापितांच्या बाजून पुस्तक बेतलेले नाही, म्हणजे ते संग्राह्य नाही, असे कसे होईल?
एकांगीपणाबद्दल म्हणशील, तर ते प्रत्येकाकडूनच होते की. अगदी एखादे "हक्कांसाठी" आंदोलन चालवले जाते, त्याचीही एकांगीच माहिती मिळते ना?
लवासा होण्याआधीही तेथील आदिवासी दारिद्र्यातच दिवस कंठत ना? लवासा झाले नसते, तर तसेच जगत राहिले असते, तर मग तेह्वा मेधाताई गेल्या असत्या का तिकडे? हाही विचार करायचा मुद्दा आहे. माझ्या वाचनात तरी असे आलेले नाही ( की त्या आधीपासून तिथल्या लोकांसाठी काम करत आहेत असे. असल्या, तर मी माझे हे विधान मागे घेईन, माझी सगळीच वाचीव माहिती हेही कबूल करतेच.) कुठेतरी काहीतरी फायदा असल्याशिवाय कोणीच लक्ष घालत नाही बहुधा..असा मला निष्कर्ष काढावासा वाटतो.
आधी वाचून पूर्ण कर
यशोधरा वाचून झाल्यावर सांग संग्राह्य आहे की नाही ते
आताच नको सांगू तसे. वाचन पूर्ण झाल्यावर तुझ्या मताला ठामपणा येईल आणि संग्राह्य का असावे याचेही कारण जास्त ठळकपणे सांगता येईल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
लवासा
'लवासा'विषयी चर्चा! क्या बात है!
या पुस्तकावर जरूर लिहा इथं. लवासा हा विषय इथं चर्चिला जावा हे चिन्ह उत्तम. पुस्तकाच्या आधारे चर्चा व्हावी हा सूर तर अत्यंत सकारात्मक आणि गरजेचा. त्यामुळं या पुस्तकाविषयी स्वतंत्र लेखन येथे केलं जावं. चर्चाही करता येईल.
यशोधरा मनावर घे गं
श्रामो ने कळीचा मुद्दा छेडला आहे.
यशोधरा मनावर घे गं
पुस्तक परिक्षण लिहिच तू आता.
मग त्या धाग्यावर छान चर्चा पहावयास मिळेल
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/