• '

इंग्रजी नव-वर्ष २०१२ च्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

हे इंग्रजी नवीन वर्ष २०१२ तुम्हा सर्वांना आनंदाचे, सुखाचे, आरोग्याचे, लक्ष्मीकृपेचे आणि भरपूर पुस्तके वाचण्याचे जावो या शुभेच्छा Smile

असेच म्हणतो

असेच म्हणतो. नववर्षाच्या पुर्वसंध्येला मायकल क्रिक्टनचे 'पायरेट्स लॅटिट्युड' घेतले. देव करो अन हे वर्ष वाचनवर्ष जाओ Smile

नववर्ष येतांना बोलती पुस्तकें सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पाची ओळख आपल्याला झाली. पुस्तकविश्ववरुन याला पुरक आणि असेच काही भरघोस काम व्हावे असे वाटते. वाचकांनी आपल्या संकल्पना जरुर मांडाव्यात असे म्हणतो.

आढावाही घ्यावा का?

सागर,

नव्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ह्यानिमित्ताने आढावाही घ्यावा का आपल्याकडच्या पुस्तकांचा? २०११ मध्ये किती घेतली? का घ्यावीशी वाटली? घेतल्यानंतर लगेच वाचली का की ती लग्गेच न वाचल्याने मागे पडली? लग्गेच का वाचली नाहीत?
जी वाचली तिच्याबाबत अपेक्षापूर्ती झाली का? म्हणजे ती घेताना काही कारणाने घेतली आणि त्याबाबत संपूर्ण अथवा बरेचसे समाधान झाले का?

ह्या अभ्यासाचा उपयोग २०१२ मध्ये खरेदी करताना होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
माझ्याकडची यादी देईनच!

अगदी.उत्तम कल्पना आहे.

अगदी.
उत्तम कल्पना आहे. माझ्याकडील नविन पुस्तकांची यादी लवकरच देतो. तशीही इथल्या धाग्यांवर घेतलेली पुस्तके आली आहेतच पण वर्षाचा एकंदरीत धांडोळा उपयुक्त ठरावा.

आणि हो
पुविच्या सर्व सदस्यांना, व्यवस्थापकांना तसेच वाचकांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझेही अनुमोदन

चित्रा,

उत्तम कल्पना आहे. वल्लीप्रमाणेच माझेही अनुमोदन आहे या कल्पनेला.
एक वेगळा धागा करुयात या विषयावर

२०११ मध्ये माझी खरेदीच भरपूर झाली आहे, तेव्हा २०१२ मध्ये वाचन पूर्ण करण्यावर जास्त भर राहील हे मात्र नक्की Smile

माझी यादी जशी जमेल तशी देण्याचा प्रयत्न करेनच, कारण भलीमोठी यादी आहे

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सगळ्यांना नववर्षाच्या अनेक

सगळ्यांना नववर्षाच्या अनेक शुभेच्छा!
या मैलाच्या दगडावर बसून कापलेल्या वाटेच सिंहावलोकन करण्याची कल्पना उत्तमच! नवा धागा कोण उघडतंय? Smile

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"